आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Thailand: सर्वात दुर्गम गुहेतील बचाव माेहीम यशस्वी; 17व्या दिवशी आणखी 4 मुले बाहेर, आता कोचसह 5 शिल्लक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅकॉंक- थायलंडच्या थाम लुआंग गुहेत अडकलेल्या फुटबॉलच्या युवा संघातील आणखी ४ मुले सोमवारी दुपारी बाहेर आली. उर्वरित ५ सदस्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दलाचे जवान गुंतले आहेत. त्यांना मंगळवार सायंकाळपर्यंत बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.

 

मात्र, पावसाचा धोका कायम आहे. त्याआधी रविवारी गुहेतून ४ मुलांना बाहेर काढले. त्यांना धरून बचावलेल्या मुलांची संख्या आठ झाली आहे. बचाव पथकाचे प्रमुख नारोंगसाक यांनी सांगितले की, सध्याही रविवारसारखीच स्थिती असून ती चांगली आहे. रविवारी पाऊस झाला होता, मात्र त्यामुळे गुहेतील पाणीपातळी वाढली नव्हती.

 

विशेष म्हणजे ११ ते १६ वर्षांचे १२ खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकासह  युवा फुटबॉल संघ २३ जून रोजी गुहा पाहण्यासाठी गेले होते. पावसामुळे आलेल्या पुरामुळे सर्व जण अडकले. त्यांना वाचवण्यासाठी जगातील सर्वात दुर्गम गुहेत बचाव मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत थायलंड, अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन व ऑस्ट्रेलियातील ९० पाणबुडे, एक हजाराहून जास्त जवान व तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. मोहीम सध्या यशस्वी होताना दिसत आहे. 

 

सर्वात आधी १३ वर्षांचा मोन्हखोल बूनपिआम गुहेबाहेर आला 

पहिल्या दिवशी सर्वात आधी ४ कृश शरीराच्या मुलांना बाहेर काढले. अधिकाऱ्यांनी साेमवारी सांगितले की, ज्या मुलांना सर्वात आधी गुहेबाहेर काढण्यात आले. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनुसार, रविवारी सर्वात आधी चार कृश शरीराच्या मुलांना बाहेर काढले. गुहेतून सर्वात आधी १३ वर्षांचा मोन्हखोल बूनपिआम बाहेर आला. त्यानंतर १५ वर्षांचा पिपत बोधू बाहेर आला. त्यांना बाहेर काढताच चियांग राई रुग्णालयात नेण्यात आले. मुले जमिनीवर येताच पाणबुड्यांनी त्यांची गळाभेट घेतली. सोमवारी बचावलेल्या मुलांची नावे सांगण्यात आली नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही प्लॅन बी तयार केला आहे. 

 

रुग्णालयात झोपेतून उठताच चौघांना भूक लागली 
थायलंडच्या गुहेत रविवारी बचावलेल्या चौघांची प्रकृती चांगली आहे. बचाव दलाच्या प्रमुखाने सांगितले की, सोमवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर या मुलांनी रुग्णालयात तांदळापासून बनवलेले पदार्थ मागितले. संसर्गाच्या भीतीमुळे मुलांना नातेवाइकांची भेट घेऊ दिली नाही. डॉक्टरांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून उपाशी असल्यामुळे मुलांची प्रकृती नाजूक आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळाचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...