आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप; महिनाभरात ट्रम्प यांचा चाैथ्यांदा यू टर्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपासंदर्भातील स्वत:च्या वक्तव्यावरून घूमजाव केले अाहे. हा यू टर्न त्यांनी स्वत:च्याच देशात टीका झाल्यानंतर घेतला अाहे. पुतीन यांना निर्दाेष असल्याचे सांगणे, हा ट्रम्प यांच्या कार्यकाळातील सर्वाधिक लाजिरवाणा क्षण असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगून टाकले अाहे. दुसरीकडे खासदारांनी ट्रम्प यांचे वक्तव्य देशद्राेहाप्रमाणे असल्याचे म्हटले अाहे.  


टीका झाल्यानंतर ट्रम्प यांनी अापली बाजू मांडली. ते म्हणाले , ‘मी नजरचुकीने साेमवारी हे वक्तव्य केले हाेते. मी २०१६मधील राष्ट्रपती निवडणुकीत गुप्तचर संस्थेने (सीअायए) केलेल्या रशियाच्या कथित हस्तक्षेपाच्या दाव्याला खरे मानताे.’ तसेच हेलसिंकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासाेबत झालेल्या पत्रकार परिषदेत एक वाक्य चुकीने बाेललाे हाेताे. मी ‘हाेणार नाही’ या शब्दांएेवजी ‘हाेईल’ शब्द वापरला हाेता.

 

पुतीन यांच्यासाेबतच्या पत्रकार परिषदेत तयार मजकुरात ट्रम्प यांनीच एक अाेळ घुसडली हाेती

ट्रम्प यांना हेलसिंकीत १०० पानांचा मजकूर तयार करून देण्यात अाला हाेता; परंतु ते पुतीन यांच्यासाेबतच्या पत्रकार परिषदेत स्वत:च्या मनाप्रमाणेच बाेलले. त्यात टाइप केलेल्या मजुकरात ट्रम्प यांनी स्वत:ची एक अाेळ घुसडली हाेती. ‘अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाची मिलीभगत नव्हती’ असे त्यात लिहिले हाेते. 

 

एक महिन्यातील तीन तारखा; तीन मुद्द्यांवर स्वत:च्या वक्तव्यांवरून घूमजाव

- १३ जून : उ.काेरियापासून धाेका नाही; पुढे बंदीत वाढ
ट्रम्प हे किम जाेंग उन यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणाले हाेते की,  अाता प्रत्येक जण सुरक्षित अाहे. उ.काेरियापासून अाता धाेका नाही; कुठलीही चिंता न करता झाेपी जा. मात्र, त्याच्या १० दिवसांनी ट्रम्प यांनी वर्षभरासाठी बंदी वाढवली हाेती. 

 

- २० जून : मुलांना वेगळे करण्यावरून घूमजाव  
ट्रम्प यांनी कठाेर भूमिका घेत अमेरिकेत अवैधरीत्या येणाऱ्या प्रवाशांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे करण्याचे धाेरण जारी केले हाेते. त्यावर पत्नी मेलेनिया ट्रम्पसह विराेध झाल्यावर ट्रम्प यांना २० जून राेजी या धाेरणावर बंदी लावावी लागली हाेती.   

 

- १२ जुलै : आधी नाटो ‘बेकार’ नंतर ‘अावश्यक’
ट्रम्प हे राष्ट्रपतिपदाची शपथ घेण्याच्या तीन दिवसांपूर्वी नाटाेला (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी अाॅर्गनायझेशन) ‘गरज नसलेले’ म्हणाले हाेते. मात्र, गत १२ जुलै राेजी त्या भूमिकेवरून पलटी घेऊन ‘संयुक्त सैन्याची संघटना नाटाेची गरज अाहे.

 

१७ वर्षांनंतर अमेरिका तालिबानशी चर्चेस तयार  
दहशतवाद्यांविराेधात माेहीम सुरू केल्याच्या १७ वर्षांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबानशी थेट चर्चा करण्याची तयारी दाखवली अाहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्य पाठवले हाेते. त्या वेळी तालिबान सरकार हटवण्यासाठी अमेरिका सरकारला काही महिने लागले हाेते; परंतु तालिबानने युद्ध सुरूच ठेवले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पुतीन यांच्यासाेबतच्या पत्रकार परिषदेत तयार मजकुरात ट्रम्प यांनी घुसडलेली ओळ...

 

 

बातम्या आणखी आहेत...