आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी उभय नेत्यांनी सिरिया, उत्तर कोरिया आणि इराण अण्वस्त्र कार्यक्रम या मुख्य मुद्द्यांवर चर्चा केली. इराण अण्वस्त्र कार्यक्रमांवर निर्बंध टाकण्यासाठी वर्ष २०१५ मध्ये झालेला करार रद्द करण्याचे संकेत उभय नेत्यांनी दिले आहेत.
यावर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेची आक्रमकता जुमानणार नसल्याचे मंगळवारीच रुहानी यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, मॅक्रोन यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेला अणुकरार पुरेसा नाही. इराण अण्वस्त्र कार्यक्रम कराराला जगभरात ‘जेसीपीआेए’ नावाने आेळखले जाते. सध्याचा करार २०२५ पर्यंतच इराणच्या अणु कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यास सक्षम असल्याचे उभय नेत्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे इराणसोबत नव्या करारावर आम्ही बोलणी करू इच्छितो. ट्रम्प यांनी पूर्वीही २०१५ च्या कराराविषयी अविश्वास व्यक्त केला आहे. मॅक्रोन यांनी या वेळी सांगितले की, इराणसोबत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम व मध्यपूर्वेची यातील भूमिका या दोन प्रमुख तरतुदींची गरज आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेला कडक शब्दांत इशारा दिला आहे. तेहरानवर आर्थिक निर्बंध शिथिल करण्याच्या अटीवरच २०१५ मध्ये इराणने या कार्यक्रमावर स्वाक्षरी केली होती.
१२ मे रोजी पूर्वीच्या कराराचा विस्तार होणे अपेक्षित होते. मात्र, ट्रम्प महासत्ता व इराणदरम्यान झालेला हा करारच रद्द ठरवू इच्छित आहेत. त्यामुळे पुन्हा अमेरिका-इराण तणाव विकोपाला गेला आहे.
पुढील स्लाईडवर पहा, मॅक्रोन आणि ट्रम्प पत्नीसह......
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.