आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क- अमेरिकेत या मोसमातील दुसऱ्या हिमवादळाने प्रचंड नासधूस केली आहे. २४ तासांत १६०० हून जास्त रस्ते अपघातांत ६ जणांचा मृत्यू झाला. जवळपास २५०० हून जास्त विमान उड्डाणे रद्द किंवा उशिराने उड्डाणे झाली. याचा ६ हजार लोकांना फटका बसला. देशात कोणत्या ना कोणत्या राज्यात बर्फवृष्टी झाली अशी स्थिती अमेरिकेत अनेक दशकांनंतर आली आहे. याआधी हिमवादळामुळे १२ फेब्रुवारी २०१० रोजी ४८ राज्यांत बर्फवृष्टी झाली होती.
कॅरोलिनाच्या काही भागांत ४० वर्षांनंतर बर्फवृष्टी, ५ राज्यांत आणीबाणी
- अलाबामा, जॉर्जिया, लुईसियाना, व्हर्जिनिया व कॅरोलिनाच्या गव्हर्नरांनी राज्यांत आणीबाणी लागू केली आहे.
- येथील सर्व पब्लिक स्कूल, कार्यालये बंद केली आहेत. वाहन न चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
- या हिमवादळामुळे ६० हजारांहून जास्त घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
- सर्वात जास्त बर्फवृष्टी नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया व न्यू इंग्लंडच्या काही भागांत झाली.
- १४ राज्यांमध्ये तापमान शून्याखाली आले. लुईसियानामध्ये सर्वात कमी तापमान उणे २० अंश झाले.
- ईशान्य भागात हिमवादळामुळे मोठे नुकसान झाले. दक्षिण भागातही बर्फवृष्टी झाली.
युरोप कवेत, नेदरलँडमध्ये १४० किमी वेगाने आले वादळ
हिमवादळाने युरोपला कवेत घेतले. जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड आणि इटलीमध्ये ताशी १०० किमी वेगाने बर्फाळ हवा सुरू आहे. नेदरलँडमध्ये झाडाखाली दबून दोघा जणांचा मृत्यू झाला. येथे ताशी १४० किमी वेगाने वादळ आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.