आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​आज मुंबईत आणले जाऊ शकते श्रीदेवीचे पार्थिव; सरकारी वकिलाच्‍या परवानगीची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई/मुंबई- कायदेशीर कारवाई पूर्ण न हाेऊ शकल्याने साेमवारीही श्रीदेवीचे पार्थिव तिच्या नातेवाइकांना मिळू शकले नाही. मंगळवारी दुपारपर्यंत तिच्या शरीरावर लेप लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळपर्यंत पार्थिव कुटुंबीयांकडे साेपवले जाऊ शकण्‍याची शकत्‍या वर्तवण्‍यात येत आहे. श्रीदेवीचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने नव्हे तर बाथटबमध्ये बुडून झाल्याची माहिती समारे आली. दुबई पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचीही पोलिसांनी चौकशी केली. आता हे प्रकरण तेथील न्‍यायव्‍यस्‍थेकडे सोपवले आहे. सरकारी वकिलाच्‍या परवाणगी नंतरच श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणता येणार आहे. त्‍यामुळे आता परिवाराला सरकारी वकिलाच्‍या परवाणगीची प्रतिक्षा आहे. इकडे  मात्र मुंबईत श्रीदेवीच्‍या वर्साेवातील बंगल्यासमाेर रविवारपासूनच चाहत्यांनी गर्दी केलेली अाहे. घरासमाेर श्रीदेवीला श्रद्धांजली वाहणारे फलकही उभारण्यात अाले अाहेत. तिचे पार्थिव साेमवारी तरी मुंबईत येईल, अशी त्यांना अाशा हाेती, मात्र ती फाेल ठरली होती. 

 

बाेनी कपूरची चार तास चाैकशी
अखेरच्या क्षणी श्रीदेवीसाेबत काय झाले हाेते, याबाबत दुबई पाेलिसांनी बाेनी कपूर यांच्याकडे तब्बल चार तास चाैकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या जबाबाचे शूटिंग करण्यात अाले अाहे. तसेच श्रीदेवीला रुग्णालयात नेणारे तीन इतर लाेकांचे, डाॅक्टरांचे व पाच कर्मचाऱ्यांचे जबाबही घेण्यात अाले.


शनिवारी रात्री दुबईतील हॉटेलमध्ये काय झाले?
- कपूर कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या हवाल्याने खलीज टाइम्सने म्हटले आहे, की बोनी कपूर लग्न सोहळ्यात सहभागी होऊन मुंबईला परतले होते. 24 फेब्रुवारीला ते पुन्हा दुबईत आले. सायंकाळी साधारण 5.30 वाजता जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलमध्ये ते पोहोचले. येथेच श्रीदेवी थांबलेल्या होत्या. बोनी हे श्रीदेवी यांना सरप्राइज डीनरला घेऊन जाणार होते. 
- बोनी आणि श्रीदेवी यांना उठवले. दोघांमध्ये 15 मिनीट बोलणे झाले. त्यानंतर श्रीदेवी वॉशरुममध्ये गेल्या. जेव्हा 15 मिनिट होऊनही श्रीदेवी बाहेर आल्यानाही तेव्हा बोनी यांनी बाथरुमचे दार वाजवले तर आतून रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यांनी धक्का देऊन दार उघडले तर आतमध्ये श्रीदेवी बेशुद्ध आवस्थेत बाथटबमध्ये पडलेल्या होत्या. 
- बोनी यांनी त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या मित्राला फोन केला. साधारण 9 वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली. 
- पोलिस आणि डॉक्टर हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांना मृत घोषित केले.


मुंबईत अंत्ययात्रेची तयारी पूर्ण, पांढऱ्या रंगाच्या असतील सर्व वस्तू
- श्रीदेवी यांचे पार्थिव अद्याप भारतात आलेले नाही. मुंबईत अंत्ययात्रेची तयारी सुरु आहे. 
- श्रीदेवी यांना पांढरा रंग खूप आवडत होता. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह, काही निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते की माझ्या अखेरच्या क्षणी सर्व वस्तू या पांढऱ्या राहातील. त्यामुळेच अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना सर्व वस्तू या पांढऱ्या रंगाच्या असतील याकडे लक्ष दिले जात आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आण‍खी फाेटो आणि माहिती...  

बातम्या आणखी आहेत...