आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रे काढून आणि नाटक लिहून बरेच पैसे कमवत होते कॉमेडियन ‘मिस्टर बीन्स’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोवन एटकिन्सन यांचा जन्म ६ जानेवारी १९५५ रोजी कॉन्सेट, इंग्लंडमध्ये झाला. वडील एरिक एटकिन्सन हे शेतकरी ती आई गृहिणी होती. रोवन हे तीन भावांमध्ये लहान आहेत. लहानपणी ते फारच लाजाळू होते. तरीही लोकांना हसविणे हा त्यांचा आवडता छंद होता.  विचित्र प्रकारे तोंड करून ते लोकांना हसवत असत.


त्यांनी न्यूकॅसल विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली . १९७५ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये  एमएस्सी करण्यासाठी  द क्वीन्स कॉलेज अॉक्सफर्डमध्ये प्रवेश घेतला.   आतापर्यंत त्यांनी काही नाटकात भाग घेतला होता. पण काही लिहिणे हा अनुभव नवीन होता. हे चित्र तयार करताना त्यांना पहिल्यांदा  जाणीव झाली की, आपण व्हिज्युअल कॉमेडी करू शकतो तसेच यात करिअर करू शकतो. कॉलेजात असताना त्यांची ओळख लेखक रिचर्ड कर्टिस व संगीतकार हॉवर्ड गुडॉल यांच्याशी झाली. तिघांनी मिळून चित्रे व नाटके करण्यास सुरुवात केली.  त्यांच्या कामाचे कौतुक होऊ लागले. त्यांचे एक नाटक पाहिल्यानंतर बीबीसीचे निर्माते जॉन लॉयड यांनी रोवन यांना टीव्ही शोमध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला.

 

आता २२ वर्षाच्या रोवनकडे दोन मार्ग हाेते. एका बाजूला त्यांचे मित्र होते, ज्यांच्याबरोबर काम करून ते चांगले पैसे मिळवू शकत होते अाणि दुसऱ्या बाजूला टीव्ही शोचा सर्वस्वी नवा प्रस्ताव होता. पण त्यांना हेही माहीत होते की, जर आपण यशस्वी झालो तर आयुष्यात फार पुढे जाऊ शकू.  त्यांनी टीव्ही शोचा मार्ग निवडला. हा शो होता, ‘नॉट द नाइन अो क्लॉक न्यूज.' हा शो यशस्वी झाला. त्यांच्या लेखन आणि अभिनयाची जाेरदार तारीफ झाली. यानंतर त्यांना ‘द ब्लॅक एडर' या टीव्ही शोचा प्रस्ताव आला. या शोचे लेखक होते त्याचे जिगरी दोस्त  रिचर्ड कर्टिस, ज्यांच्यासमवेत त्यांनी कॉलेजात असताना काम केले होते. ब्लॅक एडर सिरीज ही ब्रिटनमधील सर्वात यशस्वी सिरीज झाली. रोवन प्रत्येक ठिकाणी दिसू लागले.  त्याची लोकप्रियता वाढत चालली होती. एक दिवस बेन इल्टन नावाचे दिग्दर्शक त्यांच्याकडे एक स्क्रीप्ट घेऊन आले. ती कथा म्हणजे एक व्हिज्युअल कॉमेडी होती. यात कोणतही संवाद नव्हते.  त्याचे नाव होते चिटींग. परीक्षा देताना ते चिटींग करतात असा विषय होता. या स्केचनंतर मिस्टर बिनचे कॅरेक्टर रचले गेले जे आज सगळ्या जगात लोकप्रिय ठरले आहे.  


रोवन यांनी जेम्स बॉन्डच्या ‘नेव्हर से नेव्हर अगेन' पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. ‘डेड अॉन टाइम'मध्ये लीड रोल केला.  'द टॉल गाय अँड द विचेस'सारख्या चित्रपटातही काम केले.  १९८७ मध्ये तयार केलेला बिन हा चित्रपट फार यशस्वी ठरला.  त्याचे अनेक भागही तयार झाले. रोवनला लहानपणापासूनच जेम्स बाँड फार पसंत होते. यामुळेच त्यांनी जॉनी इंग्लिश आणि "जॉनी इंग्लिश रिबॉर्न' हे चित्रपट तयार केले. लायन किंग या चित्रपटात जजू नावाच्या पक्ष्याचा आवाज काढला. १९८६ साली ब्लॅक एडरच्या सेटवर त्यांची ओळख सुनेत्रा शास्त्री या तरुणीशी झाली. तिचे वडील भारतीय आणि आई ब्रिटिश होती. सुनेत्रा ही मेकअप आर्टिस्ट होती. १९९० मध्ये दोघांनी विवाह केला.  त्यांच्या  मुलाचे नाव बेंजामिन व मुलीचे नाव लिली अाहे. काही कारणंामुळे २०१४ मध्ये दोघांंचा घटस्फोट झाला. रोवन महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. त्यांच्याजवळ अनेक अालिशान गाड्या आहेत. मॅक्लारेन एफ-१ ही गाडीही होती,जी चालविताना त्यांचा अपघात झाला. यात ते वाचले पण गाडी खराब झाली.  विमा कंपनीने त्यांना ८ लाख पाऊंडपेक्षा  जास्त नुकसान भरपाई दिली. ही सर्वात जास्त नुकसान भरपाई होती. ते ‘कमांडर अॉफ द अॉर्डर अॉफ द ब्रिटिश एंपायर'ने सन्मानित आहेत.

बातम्या आणखी आहेत...