आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - अमेरिकी व्हिसा मिळवण्यासाठीचे नियम अधिक कठोर होणार आहेत. आता अर्जासोबत सोशल मीडिया हिस्ट्रीसह पाच वर्षांपूर्वीपर्यंतचे वापरलेले फाेन क्रमांक देणे बंधनकारक असेल. फेडरल रजिस्ट्रारनी या बदलांची माहिती दिली आहे. या नव्या व्हिसा अर्जांबाबत ६० दिवसांत लोकांची मते मागवण्यात आली आहेत.
अमेरिकेसाठी धोकादायक ठरणाऱ्या लोकांना देशात प्रवेश मिळवण्यापासून रोखता यावे यासाठी नियमांत हा बदल केला जात असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. परदेशी अर्जदारांची सखोल माहिती मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून या संशयित लोकांची या माध्यमातून ओळख पटावी हा त्यामागे उद्देश आहे.
नव्या अर्जात द्यावी लागेल ही माहिती :
{ विविध सोशल मीडियावरील युजर नेम.
{ ५ वर्षांत वापरलेले ई-मेल आयडी, फोन नंबर.
{ दहशतवादी कारवायांत तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य सहभागी आहे का, ही माहिती.
{ वैद्यकीय तपासणीची माहितीही द्यावी लागणार.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.