आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कझाकिस्तानात बस पेटली, 52 जणांचा जळून मृत्यू;मृतांत उझ्बेकिस्तानच्या नागरिकांचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अस्ताना- कझाकिस्तानमध्ये गुरुवारी धावत्या बसमध्ये आग लागली. त्यात ५२ जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये दोन चालकांसह ५५ प्रवासी होती. त्यापैकी पाच जणांनी बसमधून उड्या घेतल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.  


बस रशियातील समारा येथून कझाकिस्तानातील दक्षिणेकडील शिमकेंट शहराकडे जात होती. ही घटना एकटोबे शहराजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. आग लागल्यानंतर लोकांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली. त्यामुळे ५२ जण होरपळून मृत्युमुखी पडले, अशी माहिती आणीबाणी सेवा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कझाकिस्तानच्या परिवहन विभागात या गाडीची नोंदणी आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व लोक उझ्बेकिस्तानचे नागरिक आहेत.  उझ्बेकिस्तानच्या आणीबाणी व मदतकार्य विभागाने एक हॉटलाईन सुरू केली आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधणे शक्य होणार आहे. रशिया आणि कझाकच्या प्रसार माध्यमांनी जारी केलेल्या व्हिडिआेमध्ये जळालेली बस आणि धुराचे लोट दिसून येत आहेत. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी अॅक्टोब शहराजवळ झालेल्या अपघातात किमान १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरचा हा मोठा अपघात आहे.  गेल्या पाच वर्षांतील जगातील भीषण बस अपघातांपैकी म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. 

 

जुन्या गाड्यांचा वापर  
सोव्हिएत देशांत अजूनही अनेक दशकांपूर्वीच्या बसचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर केला जातो. गाड्या जुन्या झाल्या असल्या तरी हंगेरियासारख्या देशांत अशा गाड्या वापरल्या जातात.  

बातम्या आणखी आहेत...