आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सविताच्या मृत्यूनंतर 6 वर्षांपूर्वी मोहीम सुरू; अखेर महिलांना मिळाला गर्भपाताचा अधिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्लिन - आयर्लंडमध्ये ३५ वर्षांपूर्वी गर्भपाताला बेकायदेशीर ठरवून कायदा बनवण्यात आला. परंतु आता देशातील ३० लाख लोकांनी जनमत चाचणीत कायदा बदलण्यासाठी मतदान केले. शुक्रवारी जनमत चाचणी झाली आणि शनिवारी त्याचा निकाल घोषित करण्यात आला. यात ६८% लोकांनी महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यास सहमती दर्शवली. 


चाचणीत विशेषकरून १८   ते २४ वर्षे वयोगटातील ८७% युवकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी मत दिले. चाचणीच्या आधारावर आता देशातील संसद नवीन कायदा बनवणार आहे. महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळवून देण्याची ही लढाई ६ वर्षांपासून सुरू होती. मूळ भारतीय असलेल्या दंत चिकित्सक सविता हलप्पनवार या मोहिमेचा मुख्य चेहरा होत्या. २०१२ मध्ये गर्भपात न करता आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. गर्भातच बाळ दगावले. आयर्लंडच्या कायद्यामुळे त्यांना गर्भपात करता आला नाही. अतिरक्तस्राव झाल्याने सविता यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...