आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन देशांच्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय भांडणात युरोपातील घड्याळ लेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- सर्बिया आणि कोसोवो या दोन देशांच्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय भांडणात संपूर्ण युरोपची घड्याळे ६ मिनिटे उशिराने चालत आहेत. याच भांडणामुळे दोन्ही देशांनी युरोपच्या सामान्य पॉवरग्रीडवरून जास्तीत जास्त वीज घेतली. युरोपात प्रत्येक देश आपल्या वाट्याची वीज घेत असतो. परंतु या दोन्ही देशांनी अधिक वीज घेतल्याने बाकी देशांना त्यांचा वाटा कमी मिळत आहे. परिणामी कॉमन वॉच सिस्टिमला मिळणाऱ्या  विजेवर परिणाम झाला असून कमी ऊर्जा मिळाल्याने युरोपीय देशातील कॉमन वॉच सिस्टिम मागे पडली आहे. सगळीकडील घड्याळे ६ मिनिटे उशिराने चालतात. 


युरोपीय देशातील घड्याळ मागे राहिल्याने ओव्हनचे टायमर, अलार्म आणि रेडिओही व्यवस्थित चालत नाही. ब्रिटनला मात्र अद्याप याची झळ बसलेली नाही. युरोपातील २५ देशांना वीज मिळावी म्हणून ‘२५ नेशन सिंक्रोनाइज्ड हाय-व्होल्टेज पॉवर नेटवर्क’ नावाची सामान्य पद्धत अवलंबली गेली आहे. या नेटवर्कच्या माध्यमातूनच दोन्ही बाल्कन देश सर्बिया आणि कोसोवाला वीज मिळते. पूर्वी हे दोन्ही देश एकत्र होते. २० वर्षांपूर्वी ते विभक्त झाले. कोसोवाने सर्बियापासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. दोन्ही देश एकत्र असताना दोघांना मिळणारा विजेचा हिस्सा एक होता. विभक्त झाल्यानंतर दोघांचा विजेचा हिस्सा वाढला नाही. दोघांनी आपसात विजेचे वितरण करून घ्यावे, असे सांगितले गेले. विभक्त झाल्यापासून आतापर्यंत काही अडथळा आला नाही. पण मागील वर्षी दोन्ही देशांतील भांडण शिगेला पोहोचले. त्यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या कोट्यातून अधिक वीज घेतली. यामुळे इतर देशांना मिळणाऱ्या विजेचा हिस्सा बिघडला आणि यावर्षी जानेवारीपासून त्याचा परिणाम दिसत आहे. येथे मिळणाऱ्या विजेमुळे युरोपातील कॉमन वॉच सिस्टिम चालते. पहिला परिणाम यावरच पडला. ११३ गीगा वॅट वीज कमी पडल्याने डोमिनो परिणाम निर्माण झाला आणि नेटवर्क सिस्टिम सुस्त झाली. कॉमन इलेक्ट्रॉनिक टायमिंग सिस्टिमच्या फ्रिक्वेन्सीवर ५० हटर्जपर्यंत फरक पडला आहे. आता युरोपियन युनियन दोन्ही देशांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणार आहे.

 

डोमिना ही सातत्याने वाढणारी प्रक्रिया
डोमिना इफेक्ट ही भौतिक विज्ञानातील एक प्रक्रिया आहे. ही एक प्रकारे चेन रिअॅक्शन असते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे किंवा त्यात वाढ झाल्यामुळे जेव्हा एखादा घटनाक्रम निर्माण होतो आणि सतत तो सुरू राहतो त्याला डोमिनाे इफेक्ट म्हणतात. असाच प्रकार युरोपीय देशांमध्ये पाहायला मिळाला. ऊर्जेच्या कमतरतेमुळे आधी एक देश आणि नंतर अनेक देशांचे टाइम नेटवर्क बिघडत गेले.

बातम्या आणखी आहेत...