आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरल रिझर्व्हचे व्याजदर ‘जैसे थे’; पुढील काळात दरवाढीचे संकेत दिल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताच बदल केलेला नाही. असे असले तरी पुढील काळात व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या तेथे १.५ ते १.७५ टक्के रेपो दर आहे. अमेरिकेमध्ये रेपो दराची रेंज असते तर भारतात मात्र रिझर्व्ह बँक एकच दर निश्चित करते. सध्या भारतात ६ टक्के रेपो दर आहे. पतधोरणाचा आढावा घेणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या आठ सदस्यांच्या समितीने मार्चमध्ये व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली होती. फेडरल जून महिन्यात व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. फेडरलची पुढील बैठक १२ ते १३ जूनदरम्यान होणार आहे.   


पतधोरण आढावा बैठकीनंतर फेडरल रिझर्व्हच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानुसार महागाई दर मध्यम मुदतीत २ टक्क्यांच्या उद्दिष्टाकडे वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान महागाई दर १.९ टक्के नोंदवण्यात आला आहे. फेडररनेही आर्थिक घडामोडींबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. व्यापार, उद्योग क्षेत्रातील घडामोडींमध्ये वाढ झाली असून अलीकडच्या महिन्यांत यात मजबूत वाढ दिसून आली असल्याचेही फेडरलने म्हटले आहे. अमेरिकेमध्ये सध्या बेरोजगारीचा दर ४.१ टक्के असून हा १७ वर्षांतील सर्वात कमी आहे.  मार्च तिमाहीमध्ये देशांतर्गत खर्चातील वाढही डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कमी झाला आहे मात्र, कंपन्यांमधील गुंतवणुकीत तेजीने वाढ झाली आहे.  मार्च तिमाहीमध्ये जीडीपी वाढ २.३ टक्के होती, जी याआधीच्या तीन  तिमाहीत सरासरी विकास दराच्या ३ टक्के जास्त होती. फेडररला यामध्ये संतुलन कायम ठेवायचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महागाईत जास्त वाढ नको असल्याने व्याजदरात वाढ करण्याची फेडरलची इच्छा आहे व दुसरीकडे  वाढ केल्यास अर्थव्यवस्थेतील मागणी पुन्हा कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...