आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेद्दाह- सौदी अरब सरकारने डिसेंबरमध्ये चित्रपटावरील बंदी हटवल्यानंतर ३९ वर्षांनी अॅनिमेशनवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. जेद्दाह शहरात टेंटचे तात्पुरते सिनेमागृह उभारून प्रोजेक्टरच्या मदतीने चित्रपट दाखवला गेला. या वेळी महिला, मुलांनी गर्दी केली होती. सध्या तात्पुरत्या सिनेमागृहात चित्रपट दाखवला जात असून नवीन सिनेमागृहांचे निर्माण केले जात आहे. पहिले सिनेमागृह मार्चपर्यंत जेद्दाहमध्येच उभारले जाईल.
देशात एकूण ३०० सिनेमागृहे उभारली जातील. चित्रपट कंपनी-७० ला देशात चित्रपट प्रदर्शनाची परवानगी मिळाली. चित्रपटांमुळे देशाची सांस्कृतिक, धार्मिक ओळख नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करत १९७९ मध्ये बंदी घातली गेली. अरबमधील नागरिक चित्रपट किंवा नाटक पाहण्यासाठी बहरीन किंवा संयुक्त अरब अमिरातमध्ये जात होते. चित्रपट प्रदर्शनावरील बंदी उठवल्याने मनोरंजनासाठी नागरिकांना दुसऱ्या देशात जाण्याची गरज पडणार नाही व देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचे सौदी अरब संस्कृती आणि माहिती मंत्रालयाने म्हटले. सिने उद्योगातून पुढील १० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत १.५ लाख कोटी रुपयांची भर पडेल. ३० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
मिशन-२०३० मुळे घडतोय बदल
देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी महिलांना कार चालवण्याचा अधिकार, योगाला खेळाचा दर्जा आदी महत्त्वाची पावले उचलण्यात आली. चित्रपट प्रदर्शनावरील बंदी उठवण्याचा निर्णयही याचाच एक भाग आहे. क्राऊन प्रिंस सलमान यांनी ठरवलेल्या व्हीजन -२०३० नुसार देशाची कट्टर प्रतिमा सुधारण्यासाठी फायदा होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.