आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली 'टेस्ट ट्यूब बेबी' चाळिशीत; तिरस्कार करणारे पाठवायचे रक्ताने लिहिलेली पत्रे अन् प्लास्टिकचे भ्रूण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडच्या ओल्डहॅम रुग्णालयाबाहेर छायाचित्रकार आणि पत्रकारांची मोठी गर्दी होती. २५ जुलै १९७८ रोजी येथे जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊन यांचा जन्म झाला. त्यांना कालांतराने 'बेबी ऑफ सेंच्युरी' म्हटले गेले. लुईस इतर शिशूंप्रमाणे ठणठणीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांच्या ६० पेक्षा अधिक तपासण्या झाल्या. पुढील आठवड्यात त्या ४० वा वाढदिवस साजरा करतील.

 

लुईस सध्या एका शिपिंग ऑफिसमध्ये काम करत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. लुईस यांनी २००४ मध्ये नाइट क्लबमधील बाउन्सर वेस्ले मुलिंडरसोबत विवाह केला. लुईस यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केल्याप्रमाणे, त्या काळात आई-वडिलांना हजारो पत्रे लिहिली गेली. बहुतांश पत्रे तिरस्कार करणारी होती. एक पत्र तर रक्ताने लिहिलेले होते. धार्मिक नेते आणि अनेक लोक टेस्ट ट्यूब बेबीला चुकीचे व निसर्गाच्या विरुद्ध मानत होते. एकदा कुणीतरी त्यांना तुटलेली टेस्ट ट्यूब पाठवली होती. धमकीचे पत्र मिळाले. लोकांनी त्यांना प्लास्टिकचे भ्रूणही पाठवले. एका पार्सलवर लुईस ब्राऊन, टेस्ट ट्यूब बेबी, ब्रिस्टल, इंग्लंड लिहिलेले होते. सॅन फ्रान्सिस्कोहून पाठवलेल्या या पार्सलमध्ये एक छोटा बॉक्स होता. यात एक कागदाचा तुकडा आणि टेस्ट ट्यूब बेबी वॉरंटी कार्ड लिहिलेले एक कार्ड होते. यासोबत एक छोटे पुस्तक होते. यात टेस्ट ट्यूब बेबीला टॉयलेट बाऊल किंवा फिश टँकमध्ये ठेवता येते, असे नमूद करण्यात आले होते. तिरस्कार करणारे संदेश येत असल्याने आई लेस्ली त्यांना घराबाहेर घेऊन जाण्यास घाबरत होती, असे लुईस यांनी म्हटले.

 

जगात ८० लाखांपेक्षा जास्त टेस्ट ट्यूब बेबी
आजपर्यंत जगभरात ८० लाख टेस्ट ट्यूब बेबींनी जन्म घेतला आहे. सध्या सुमारे ५ लाख मुले दरवर्षी जगभरात या तंत्रज्ञानामुळे जन्माला येतात. भारतात ६ ऑगस्ट १९८६ रोजी पहिली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडाचा जन्म झाला होता. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच मुलाला जन्म दिला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...