आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट झाले तिशीचे, काम मात्र वृद्धाप्रमाणे; वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरमचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेटची सुरुवात होऊन ३० वर्षे उलटली आहेत. सद्य:स्थितीनुसार इंटरनेटने तारुण्यात असले पाहिजे, पण दुर्दैवाने वय पूर्ण झाल्याचे संकेत दिले जात आहेत. डेड लिंक्सनी पेज भरलेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पहिल्यांदा कार्यालयात पाऊल ठेवले तेव्हा सरकारी डोमेनमधील ८३% फाइल्स नाहीशा झाल्या होत्या. हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या माहितीनुसार, ७०% लिंक्स निरुपयोगी आहेत. वेब डिरेक्टरीवरील ३०% लिंक्सवर "४०४ डेड पेजेस' दाखवले जातात. वेबसाइट्सची वाढती गती पाहता ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. खूप कमी पेजचे आयुष्य कमीत कमी ७२ तासांपर्यंत असते. 


लिंक्समध्ये सुधारणा हाेईपर्यंत गती वाढणार नाही 
एका वेबसाइटमध्ये अनेक लिंक्स असतात. प्रत्येकाचे डोमेन नेम वेगवेगळे असते. डोमेनवर क्लिक करताच वाचक पोस्टवर पोहोचतो आणि वेबसाइटच्या एका पेजवरून दुसऱ्या पेजपर्यंत जाता येते. याच लिंक्ससंदर्भात येथे माहिती दिली गेली आहे. 


लिंक्स निरुपयोगी झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पहिल्या पिढीने अनेक खस्ता खाल्ल्यानंतर औद्योगिक विकास पाहायला मिळाला. तशाच पद्धतीने येणारी पिढी डिजिटल वेस्टकडे कशी पाहते आणि याला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखते हा प्रश्न निर्माण झाला आहे. आशयाद्वारे प्रकाशक महसुलावर भर देत असतात. एखादी कथा, माहिती जोपर्यंत लिंक्समध्ये असते तोपर्यंत त्याचे महत्त्व कायम असते. यातून काही ना काही तर मिळतेच. परंतु जाहिरातीचा महसूल जमवण्याच्या स्पर्धेत प्रकाशक मात्र हे विसरून जातात की, पत्रकार किंवा संपादक आठवड्याला लिहीत असलेले मोठे लेखच त्यांची खरी संपत्ती आहे. काही प्रतिष्ठित प्रकाशकांच्या मते, दोन महिन्यांपेक्षा जुने लेख ६०% लोकांद्वारे वाचले जातात. 


आतापर्यंत केवळ डेड लिंक्स शोधण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. परंतु ह्या लिंक्समध्ये सुधारणा करणार नाही तोपर्यंत इंटरनेटची गती वाढवण्याच्या दृष्टीने परिणाम होणार नाही. वास्तविक पाहता सध्याच्या सृजनशील तंत्रज्ञानामुळे समस्या सोडवण्याचा प्रयत्न होतो. प्रकाशक आणि तंत्रज्ञांनी गुंतवणूक केल्यास ४०४ डेड पेजवर उपाय शोधला जाऊ शकतो. ऑनलाइन लिंक्स निरुपयोगी होण्याची समस्या प्रकाशकाकडून उद्भवू शकते. 


संपादकीयच्या मार्केटिंगसाठी याची लिंक रिटेलरकडे पाठवली जाते. रिटेलरच्या वेबसाइटवर उत्पादने सातत्याने बदलत जातात. याचमुळे ४०४ डेड पेजेसची संख्या वाढत जात आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सदस्य नेरेटिव्ह यांनी मागील दोन वर्षांत एक अब्जहून अधिक लिंक्स पुन्हा सुरू केल्या आहेत. आपण जेव्हा एखादी बाब इंटरनेटवर शोधतो तेव्हा ४०४ डेड पेज दिसले की निराशा होते. परंतु आता पूर्ण क्षमतेने याला संपवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...