आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपात गुगलला तब्बल 34 हजार कोटी रु.चा दंड, रक्‍कम भरण्यासाठी 90 दिवसांची मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रुसेल्स - अँड्रॉइडच्या एकाधिकाराच्या गैरवापराचे दोषी ठरवत युरोपियन युनियनने (ईयू) गुगलला तब्बल ३४,२५० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ईयूच्या प्रतिस्पर्धा आयुक्त मार्गारेट वेस्टेजर यांनी तीन वर्षांच्या चौकशीनंतर बुधवारी हा निकाल सुनावला.


त्या म्हणाल्या, गुगल अँड्रॉइड मोफत देते, मात्र कंपनीने फोन व टॅब्लेट निर्मात्या कंपन्यांना दुसरे वेब ब्राऊजर व सर्च इंजिन इन्स्टॉल करण्यापासून रोखले. फोनमध्ये आधीपासूनच गुगल सर्च इन्स्टॉल करणारे उत्पादक व टेलिकॉम कंपन्यांना गुगलने पैसेही दिले. यामुळे इतर कंपन्यांना कमी संधी मिळाली. दरम्यान, गुगल या निकालाला आव्हान देणार आहे. गुगलला दंड भरण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे. या दरम्यान कंपनीने व्यवसायाची पद्धत बदलली नाही तर पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या रोजच्या उलाढालीच्या ५ टक्क्यांच्या हिशेबाने दंड आकारला जाईल.

बातम्या आणखी आहेत...