आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिशंकू जनादेश, भ्रष्ट बर्लुस्कोनींची आघाडी सत्तेत येण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- इटलीच्या नव्या संसदेच्या निवडणुकीचा जनादेश खंडित आला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान केंद्रांवरील मतमोजणी पूर्ण झाली होती. त्यात एक्झिट पोलमधील दावे निकालात रूपांतरित होत असल्याचे दिसत आहे. आरएआय या सरकारी चॅनेलने सोमवारी एक्झिट पोलमध्ये केलेल्या दाव्यानुसार, माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांच्या फ्रीडम ऑफ पीपल या आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, पण स्पष्ट बहुमत मिळणार नाही. फाइव्ह स्टार मूव्हमेंट हा विरोधी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. एक्झिट पोलमध्ये बर्लुस्कोनी यांच्या आघाडीला २२५-२६५ जागा, फाइव्ह स्टार मूव्हमेंटला १९५ ते २३५ जागा आणि सत्तारूढ मध्य-डाव्या आघाडीला ११५-१५५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इटलीच्या ‘चेम्बर ऑफ डेप्युटीज’ या कनिष्ठ सभागृहाचे ६३० सदस्य आणि सिनेटच्या ३१५ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. 

 

एक्झिट पोलमध्ये कोणाला किती मते

- ३७टक्के मते बर्लुस्कोनींच्या चार पक्षांच्या आघाडीला

- ३१  टक्के मते फाइव्ह स्टार मूव्हमेंट या विरोधी पक्षाला

- २२   टक्के मते सत्तारूढ मध्य-डाव्या पक्षाला

- ६३०  सदस्य आहेत इटलीच्या ‘चेम्बर ऑफ डेप्युटीज’ या कनिष्ठ सभागृहात

 

बर्लुस्कोनींनी अँटोनियोंना पीएम उमेदवार केले
फसवणूक प्रकरणात शिक्षा झालेले माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी स्वत: पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या आघाडीतर्फे युरोपीय संसदेचे अध्यक्ष अँटोनियो तजानींना पीएम पदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे.

 

पराभव रेंजींचा पक्ष सत्तेबाहेर जाणार

एक्झिट पोलनुसार माजी पीएम मत्तेओ रेंजी यांचा डेमॉक्रॅटिक पक्ष ५ वर्षे राज्य केल्यानंतर निवडणुकीत पराभूत होताना दिसत आहे. त्यांच्या पक्षाला सिनेटमध्ये १५५ कमी जागा मिळतील.

 

संकट सरकार बनवा, असे कोणाला सांगणार

त्रिशंकू निकालांच्या संकेतांमुळे अध्यक्ष सेर्गियो मॅट्टारेला यांच्यासमोरही संकट उभे आहे. सरकार स्थापनेसाठी कोणाला बोलवावे याचा विचार त्यांना २३ मार्चच्या बैठकीपूर्वी करावा लागेल.

 

 

परिणाम : जगभरातील बाजारात घसरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रेक्झिटचा परिणाम निवडणुकीवर झाल्याचे मानले जात आहे. त्रिशंकू संकेत मिळताच इटली, युरोपसह जगातील बाजारात घसरण दिसली.

 

पंतप्रधानांची निवड थेट होत नाही
इटलीत जनता थेट पंतप्रधान निवडत नाही. निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडलेल्या संसदीय समूहाच्या प्रतिनिधींना बोलावतात. विश्वासमत मिळवण्यासाठी कोणता पक्ष, आघाडीकडे पुरेशी संख्या आहे, याची माहिती ते घेतात.

 

 सोशल मीडियावर राहुल यांची थट्टा

राहुल गांधी सध्या इटलीत आजीच्या घरी आहेत. भाजप आमदार मनजिंदरसिंग यांनी ट्विट केले- पुढील पंतप्रधान...इटलीचा.

- कविता दीक्षित यांनी ट्विट केले-सॉरी सर, तुम्ही इटलीवासीयांचा अपमान करत आहात. तेथेही एका चतुर पीएमची गरज आहे.

 

बातम्या आणखी आहेत...