आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान्यांनी केला छावणीवर हल्ला,11 पोलिसांचा मृत्यू; तडजोडीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात सातत्याने दुसऱ्या दिवशी मोठा हल्ला केला. पश्चिमेकडील हेरात प्रांतातील शिनडांड जिल्ह्यात गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी पोलिसांच्या छावणीवर हल्ला केला. त्यात ९ पोलिसांचा मृत्यू झाला.  


हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या मदतीसाठी येणाऱ्या पोलिस दलास रस्त्यावर पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटाचा मुकाबला करावा लागला. त्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा मुख्यालयापासून किमान पाच किमी अंतरावर असलेल्या पोलिस छावणीवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दोन वाहनांना नष्ट केले. बुधवारी रात्री तालिबान दहशतवाद्यांनी गजनी प्रांतातील खुजा आेमरी जिल्ह्यात सरकारी कार्यालयास लक्ष्य केले होते. त्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने २५ दहशतवाद्यांना ठार केेले. 
  
तालिबानी दहशतवाद्यांवर दबाव  
राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबानी दहशतवाद्यांना शांततेसाठी वाटाघाटीचे आवाहन केले आहे. त्याला तालिबानी दहशतवाद्यांना अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे तालिबान दहशतवादी संघटना दबावाखाली आहे. त्यातून हे हल्ले केले जात असल्याचे सांगण्यात येते. 

बातम्या आणखी आहेत...