आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आईचे दूध' प्रस्तावाला विरोध; ट्रम्प प्रशासनाने घेतली कंपन्यांची बाजू!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवजात अर्भकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विपरीत भूमिका घेत ट्रम्प प्रशासन अजब धोरणाचे समर्थन करत आहे का? काही कंपन्यांच्या हितासाठी असे केले जात असावे. कारण नवजात अर्भकांसाठी उत्पादित होणाऱ्या वस्तूंची जगातील बाजारपेठ ४५ अब्ज डॉलर्सची आहे. ट्रम्प सरकारने एक निर्णय घेऊन वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीमध्ये स्तनपान प्रस्तावाला नाकारण्याचा प्रयत्न केल्याने हा संशय व्यक्त करण्यात आला. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, ते स्तनपानाच्या विरोधात नाहीत. मात्र, मातांसाठी पर्याय निवडीचे स्वातंत्र्य ते अबाधित ठेवू इच्छित आहेत.

 

एका मातेला आपल्या अपत्याची जितकी चिंता असते तितकी इतर कोणालाही नसते. मुलाची देखभाल योग्यरीत्या होत आहे वा नाही, हा तिच्या मन व मेंदूशी जोडलेला भाग आहे. मात्र, सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. त्यामुळे मेंदूदेखील हा निर्णय घेऊ शकत नाही. योग्य-अयोग्य यांचा गोंधळ आहे. ट्रम्प प्रशासनाने असा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे. वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीने असा प्रस्ताव ठेवला होता की, सर्व देशांमध्ये याविषयी संदेश प्रत्येक स्तरावर पोहोचवला जावा. मातेचे दूधच सर्वश्रेष्ठ आहे, यावर असेम्ब्ली दृढ आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने याच्याशी सहमती दर्शवली नाही. अमेरिकी प्रतिनिधींवर यामुळे टीका होत आहे. काही कंपन्यांच्या हितासाठी ते मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप आहे.

 

सर्व आकडेवारी आणि तथ्यांच्या विश्लेषणानंतर अमेरिका आईने दिलेल्या स्तनपानाच्या बाबतीत सर्व श्रीमंत देशांच्या तुलनेत मागे आहे. इतकेच नाही, तर स्तनपानाला प्रोत्साहन देण्याच्या बाबतीतदेखील अमेरिका पिछाडीवर आहे. सध्या केवळ निम्म्या अमेरिकी माता स्तनपान देतात. याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यानुसार धोरण, जसे - पगारी मातृत्व रजा इत्यादींवर तिथे गांभीर्याने निर्णय घेतला जात नाही. वर्तमान प्रशासनाचा हा निर्णय १९८१ नुसारच आहे. तेव्हा ११८ देशांमध्ये सर्वसंमतीने स्तनपानाला आव्हान ठरलेल्या कंपन्यांना विरोध करण्यात आला होता. अमेरिकेचा त्याला अपवाद होता. इतरत्र गर्भवती महिलांना या कंपन्यांची उत्पादने घेण्यापासून परावृत्त करण्याचे धोरण त्या वेळी आखले होते.

 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार या धोरणांमुळे नवजात अर्भकांचे मृत्यू, कुपोषण आणि अतिसारासारख्या आरोग्याची कुरुबुरी सुरू होतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, ते मातांच्या स्तनपानाविरोधात नाहीत. मात्र, मातांनादेखील पर्याय निवडीचा अधिकार द्यावा याविषयी ठाम आहेत. आरोग्य व मानव सेवा विभागाच्या प्रवक्ता केटलिन यांनी सांगीतले की, या निर्णयामागची भूमिका वेगळी आहे. काही माता मुलांना स्तनपान करण्यास सक्षम नसतात. त्यांच्यावर समाजाने टीका करू नये. त्यामुळे पर्याय देणे योग्य आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या अध्यक्षा कोलीन ए. क्राफ्ट यांच्या मते, स्तनपान हा विषय जीवनशैलीशी संबंधित नसावा. हा मुलांच्या जीवनाचा प्रश्न म्हणून पाहाणे योग्य आहे.

बातम्या आणखी आहेत...