आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डच पंतप्रधानांनी मुद्दा खोडताच ट्रम्प यांनी मध्येच सोडली पत्रकार परिषद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओव्हल कार्यालयामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मार्क रूट यांच्यात चर्चा सुरू झाली. - Divya Marathi
ओव्हल कार्यालयामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मार्क रूट यांच्यात चर्चा सुरू झाली.

वॉशिंग्टन- अमेरिका आणि युरोपीय युनियन (ईयू) यांच्यात व्यापारावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा दिसला. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट सोमवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी ओव्हल कार्यालयात अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली. दोघे एकत्र पत्रपरिषद घेत होते, पण ती फक्त ५ मिनिटे चालली. तीत ट्रम्प आणि रूट यांनी ईयू आणि अमेरिका यांच्यातील व्यापारावर चर्चा सुरू केली. सुरुवातीला ट्रम्प बोलत होते आणि रूट ऐकत होते. तेव्हा ट्रम्प रूट यांना म्हणाले की, मी हा मुद्दा जी-७ परिषदेत अर्धवट सोडून दिला होता, पण त्याबाबत मी अजूनही सकारात्मक आहे. त्यावर हसत रूट ट्रम्प यांना म्हणाले नाही.. त्यानंतर ट्रम्प रूट यांना धन्यवाद म्हणाले आणि पत्रपरिषद मध्येच सोडून निघून जाऊ लागले. ते पाहून रूट माध्यमांना म्हणालेे की, हे सकारात्मक नसेल. त्यासाठी आम्ही काही करू.   


पत्रकार परिषदेत ट्रम्प आणि रूट यांच्यातील संवाद...
ट्रम्प :
एका व्यापारी करारासाठी आम्ही खूप जवळ आलो आहोत. हा चांगला करार असेल. मी त्याला फक्त चांगला म्हणत नाही, मी फेअर डील म्हणू इच्छितो. फेअर डील आमचे करदाते, कामगार आणि शेतकऱ्यांसाठी राहील. त्यात अनेक चांगल्या गोष्टी असतील. मला वाटते की, ईयूच्या मुद्द्यावर आम्ही लवकरच एक फेअर मीटिंग घेऊ. ते (ईयू) याबाबत काय करतात हे मला पाहायचे आहे. जर काही झाले तर चांगले, सकारात्मक राहील. जर काही झाले नाही तरीही सकारात्मकच राहील.   
रूट (ट्रम्प यांचा मुद्दा खोडताना) : नाही.  (ट्रम्प यानंतर रूट यांना आभारी आहे म्हणत जाऊ लागतात.) 
ट्रम्प : जरा, येथे कारची गर्दी तर पाहा..   
रूट : हे सकारात्मक नसेल. आम्हाला काही करावे लागेल.   
ट्रम्प : हे होईल...सकारात्मकच होईल, पण पुन्हा एकदा, मिस्टर प्राइम मिनिस्टर, येथे येण्यासाठी आभार.   
रूट : मलाही येथे येऊन चांगले वाटले.   


अमेरिका-ईयू यांच्यात व्यापारावरून वाद   
या वर्षी मेमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेद्वारे ईयूकडून आयात केलेल्या वाहनांच्या सुट्या भागांची तपासणी करून घेतली होती. ईयूच्या नाराज नेत्यांनी ट्रम्प यांना ११ पानांचा एक दस्तऐवज पाठवला होता. त्यात त्यांनी अमेरिकी वस्तूंवर १९.३५ लाख कोटी रुपयांचा कर लावू असे म्हटले होते. उत्तरात ट्रम्प यांनी म्हटले की ईयूने कर हटवला नाही तर आम्ही युरोपीय कारवर २०% कर लावू.


जी-७ परिषदेतही वाद समोर आले होते   
गेल्या महिन्यात कॅनडात झालेल्या जी-७ परिषदेतही व्यापार व कराचा मुद्दा प्रभावी होता. अमेरिकेने अलीकडे व्यापार नियम कडक केले आहेत. नव्या नियमांअंतर्गत आयात होणाऱ्या पोलादावर २५% आणि अॅल्युमिनियमवर १०% आयात शुल्क लावले आहे. त्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी परिषदेतच ट्रम्प यांना विरोध केला होता.


साधी वर्तणूक हीच आहे रूट यांची ओळख   
रूट ८ वर्षांपासून नेदरलँडचे पंतप्रधान आहेत. ते आपल्या साध्या वर्तणुकीसाठी ओळखले जातात. एकदा नेदरलँडच्या संसद भवनात त्यांच्या हातून कॉफी पडली होती. तेव्हा  स्वत: रूट यांनी स्वच्छता केली होती. ते अॅमस्टरडॅमच्या राजमहालातही अनेकदा सायकलने गेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...