आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक, कुटुंबाचा उल्लेख केल्याने ट्रम्प यांची लोकप्रियता वाढली, 40% नागरिक सहमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रात भाषण केले. त्यांनी भाषणात सैनिक, कुटुंब, मित्र यांचा उल्लेख केला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. अमेरिकेतील मॉनमाऊथ विद्यापीठ दर महिन्यात सर्व्हे करते. देशातील नागरिक किती टक्के राष्ट्राध्यक्षांशी सहमत आहेत, याविषयी हा सर्व्हे असतो. ट्रम्प यांच्या स्टेट ऑफ युनियनमधील भाषणानंतर वर्षभरात प्रथमच ४०% नागरिक त्यांच्याशी सहमत दिसून आले. जानेवारीमध्ये अमेरिकेचे ४२% लोक आपल्या राष्ट्राध्यक्षांशी सहमत होते. डिसेंबरमध्ये ३२% ट्रम्प यांच्याशी सहमत होते. जानेवारीमध्ये असहमत असलेल्यांची संख्या ५०% होती. डिसेंबरात हा टक्का ५६ होता. मॉनमाऊथच्या डिसेंबरमधील सर्व्हेमध्ये लोकांनी म्हटले की, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून यशस्वी नाहीत. जानेवारीत असे मानणाऱ्यांचा टक्का घटून ४१% झाला. ५६% नागरिकांनी मान्य केले होते की, संसदेत एकमत ठेवण्यात ते यशस्वी होत आहेत. 

 

३ मुद्दे लोकप्रियता वाढवणारे होते .

 सैनिक : स्पेशल एजंट सेलेस्टिनो मार्टिन यांना मी येथे निमंत्रित केले. त्यांनी अवैध कामांविरुद्ध मोहिमांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी ४०० पेक्षा अधिक माफियांना अटक केली.

 
कुटुंब : आज या सभागृहात एक दांपत्य उपस्थित आहे. त्यांनी गेल्या महिन्यात आपल्या मुली गमावल्या. त्यांच्या मुली माथेफिरूच्या हल्ल्यात मारल्या गेल्या. अशा हल्ल्यात आपली माणसे ठार होतात. हिंसेविरुद्ध कायद्यासाठी काँग्रेसने एकजूट व्हावे.


तरुण : व्यसनामुळे २०१६ मध्ये आपण ६४ हजार अमेरिकनांना गमावून बसलो. म्हणजे दरदिवशी १७४ नागरिक व्यसनामुळे मारले गेले. व्यसन व त्याच्याशी संबंधित व्यापारावर लगाम घालणे आपला प्राधान्यक्रम आहे. 

बातम्या आणखी आहेत...