आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीमध्ये युरोपात सूर्यप्रकाशच लपला, वीस दिवसांत लंडनमध्ये 30 तास प्रकाशदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- युरोपातील देशांमध्ये २०१८ मध्ये सूर्यप्रकाश मिळणे मुश्कील झाले आहे. जानेवारीचे २० दिवस उलटल्यानंतरही लंडनमध्ये केवळ ३० तास, पॅरिसमध्ये १० तास सूर्यप्रकाश मिळाला. आतापर्यंत जानेवारीच्या २० दिवसांत लंडनला सरासरी ६२ तास आणि पॅरिसला ६३ तासांपर्यंत सूर्यप्रकाश मिळत राहिला आहे. जानेवारी १९४८ मध्ये पहिल्या २० दिवसांत पॅरिसला १३  तासांपर्यंत सूर्यप्रकाश मिळाला होता. या वर्षी ७० वर्षांचा हा विक्रम मोडीत निघाला. युरोपीय देशांत कडाक्याची थंडी पडल्याने ही परिस्थिती उद््भवली. फ्रान्सचे मनोविकारतज्ज्ञ मॅथ्यू हिन म्हणाले की, सूर्यप्रकाश कमी मिळत असल्याने लोकांना सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (सॅड) हा आजार होत आहे. या अवस्थेत अनेक दिवस सूर्यप्रकाश नाही मिळाला तर लोकांना थकवा जाणवतो, नैराश्य येते. शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार होते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर मेलाटोनिनचे शरीरातील प्रमाण संतुलित राहते. युरोपीय शहरांतील लोकांच्या शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण सध्या बिघडत आहे. त्यामुळे दिनचर्येत बदल झाला.

यापासून सुटकेसाठी लोक सध्या ‘लाइट थेरपी’ घेत आहेत. कृत्रिम प्रकाश तयार करण्यासाठी ओझोन, सर्व आवश्यक घटकांचा त्यात समावेश केला जातो. फ्रान्सचे लाइट थेरपिस्ट फ्लोरेंट डुरांड म्हणाले, लाइट थेरपीसाठी त्यांच्याकडे दररोज ३९ सेशनची बुकिंग होत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फ्रान्समधील लिली शहरात ३ तास, रशियाच्या मॉस्कोत ४० मिनिटे मिळतो प्रकाश...

बातम्या आणखी आहेत...