आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US:बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून ठगवले, 21 भारतीयांना 20 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारवाई होऊ नये म्हणून अमेरिकन नागरिकांकडून 500 ते 60 हजार डॉलरपर्यंत रक्कम उकळली जात होती. या प्रकरणी पुणे, नोएडा आणि गुडगांवमध्येही छापे मारण्यात आले होते. 

 

न्यूयॉर्क - अमेरिकेत राहणाऱ्या 21 भारतीयांना बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळल्याच्या आरोपात 4 वर्षांपासून ते 20 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या भारतीयांना शिक्षा उपभोगल्यानंतर भारतात पाठवले जाईल. कॉल सेंटर भारतातून ऑपरेट होत होते आणि अमेरिकेत दोषी ठरवलेले 21 जण या रॅकेटमध्ये सहभागी होते आणि अमेरिकेत राहत होते. कॉल सेंटरच्या भारतातील विविध शहरात शाखा होत्या. त्या माध्यमातून 11 हजार अमेरिकन नागरिकांकडून 250 कोटींपेक्षा अधिक रक्कम उकळली होती. 


कॉल सेंटर्समधील भारतीय कर्मचारी अमेरिकन इंग्रजी बोलून लोकांना फसवायचे. ते आधी टॅक्स चोरी करणाऱ्या अमेरिकन नागरिकांची माहिती मिळवायचे. त्यानंतर ते अमेरिकन इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्याच्या नावाने फोन करायचे. त्यांना डॉलरमध्ये पेमेंट करायला सांगायचे. पेमेंट केले नाही तर अटक किंवा दंडाची भिती दाखवायचे. यात प्रामुख्याने वृद्धांना लक्ष केले जात होते. कारवाई होऊ नये म्हणून अमेरिकन नागरिक 500 ते 60 हजार डॉलर (सुमारे 34 हजार ते 41 लाख रुपए) द्यायलाही तयार व्हायचे. 


बक्षीस मिळायचे 
पोलिसांनी सांगितले की, कॉल सेंटरवर जो भारतीय कर्मचारी अमेरिकन लोकांकडून पैशे उकळण्यात यशस्वी होईल त्याला रॅखेट चालवणारे दर महिन्याला एक लाखाचे बक्षीस द्यायचे. अमेरिकेत या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पुणे, नोएडा आणि गुडगावमध्ये छापे मारण्यात आले होते. पुण्यातून तीन , गुडगावमधून चार आण नोएडातून एकाला अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आले की, पुण्याच्या कॉल सेंटरमधूनच अमेरिकेतील 11 हजार लकोंना फसवण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...