आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा भारतीय संकल्पनेवर फ्रान्सच्या जगप्रसिद्ध उत्सवात विविध शिल्पे;लेमन फेस्टिव्हल फ्रान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेंटन (फ्रान्स)- फ्रान्सचा जगप्रसिद्ध लेमन फेस्टिव्हल शनिवारपासून सुरू होत आहे. महोत्सवाचे यंदाचे ८५ वे वर्ष असून भारतीय संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १४५ टन संत्रा व लिंबापासून शिल्प तयार करण्यात आले आहे. शिल्पात श्री गणेश, गजराज, भारतीय रिक्षा इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. हे शिल्प ३०० हून जास्त कलाकारांनी मिळून साकारले आहे. हा महोत्सव १७ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान चालणार आहे. महोत्सवाची तयारी एक महिना अगोदरपासून चालते. महोत्सवातून मिळणाऱ्या कमाईचा मोठा भाग धर्मादाय कामांसाठी दिला जातो हे विशेष. हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २.५ ते ३ लाख लोक येण्याचा अंदाज आहे. यजमान शहर असलेल्या मेंटन येथील ५०० हून जास्त हॉटेल फुल्ल झाले आहेत.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, १९३४ मध्ये सुरू झाला होता उत्सव...

बातम्या आणखी आहेत...