आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिकन बनले कठाेर; बंदूक विक्रीबाबत ट्रम्प घेऊ शकतात माेठा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी सर्व राज्यपालांना नुकतेच भाेजनासाठी अामंत्रित केले हाेते. त्यात निश्चितच ‘बंदूक नियंत्रण’वर चर्चा हाेणार हाेती. कारण सर्व राज्यपालांना राज्यातील नागरिकांचा अावाज एेकावा लागत अाहे. फ्लाेरिडातील गाेळीबाराच्या घटनेत १७ जणांचा जीव गेला. या घटनेनंतर बंदूक नियंत्रणाबाबत कठाेर निर्णय घेतला जावा, अशी अमेरिकेतील नागरिकांची इच्छा अाहे; परंतु याबाबतचे धाेरण ट्रम्प यांनाच तयार करावे लागेल.

 

मात्र, त्यांना  २०१६मधील प्रचारादरम्यान नॅशनल रायफल असाेसिएशन (एनअारए)कडून माेठा निवडणूक निधी मिळाला हाेता. असे असताना ‘ही वेळ बंदूक अधिकाराच्या लाॅबीशी सामना करण्याची अाहे. तुम्हाला एनअारएची भीती अाहे; परंतु त्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही’ असे ट्रम्प यांनी राज्यपालांंना सांगितले.


राष्ट्रपती ट्रम्प हे असे एकमेव रिपब्लिकन असावेत, ज्यांनी पार्कलॅण्डमधील घटनेनंतर बंदुकांबाबतचा  दृष्टिकाेन बदलला अाहे. शस्त्र चालवण्याचे वेगळे प्रशिक्षक असावेत, असे ट्रम्प यांना, तर जास्त काडतुसांच्या बंदूक विक्रीबाबत कठाेर भूमिका घेण्यात यावी, असे इतर रिपब्लिकनांना वाटते. पार्कलॅण्ड येथील शाळेत गाेळीबार करणाऱ्याकडे अधिक काडतुसांची रायफल हाेती. रिपब्लिकन नेते बंदूक नियंत्रणावरील अापला विराेध मागे घेण्याची शक्यता अाहे. अमेरिकेतील जनता अापला संयम गमावून बसली असल्याचे राजकीयतज्ज्ञांचे म्हणणे अाहे. दाेन वरिष्ठ रिपब्लिकन सदस्यांनी सांगितले की, एनअारएने बंदूक नियंत्रणाबाबत नवीन नियम बनवण्यास हिरवी झेंडी दाखवली अाहे. तथापि, मागील दशकात त्यांना माेठे नुकसान झाले हाेते. अाम्हास बंदुकांच्या विक्रीची नाही, तर बंदूक बाळगण्याच्या अधिकाराची चिंता अाहे व त्यावर गदा अाणण्यात येऊ नये, असे एनअारएच्या प्रवक्त्या जेनिफर बेकर यांनी सांगितले.

 

या उद्याेगातील तज्ज्ञांचा अंदाज अाहे की, एनअारएने ट्रम्प अाणि इतर रिपब्लिकन सदस्यांच्या विजयासाठी ३५५ काेटी रुपये खर्च केले हाेते. हिलरी क्लिंटन जिंकल्या असत्या तर बंदुकांची माेठ्या प्रमाणावर विक्री झाली असती. कारण बंदूक उद्याेग बिल क्लिंटन यांच्या प्रशासन काळात खूप फाेफावला हाेता. अाेबामा राष्ट्रपती हाेते तेव्हा बंदुकांची विक्री ४२ % वाढली हाेती; परंतु ट्रम्प यांनी बंदुकांची विक्री किंवा बंदूक खरेदी करण्याची वयाेमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला, तर बंदूक उद्याेगाला माेठा फटका बसेल.

बातम्या आणखी आहेत...