आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक कर्ज 10,660 लाख कोटींच्या घरात, मंदीचा धोका वाढला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -जागतिक कर्ज १६४ लाख कोटी डॉलर म्हणजे सुमारे १०,६६० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यामुळे जगावरच आर्थिक मंदीचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) याबाबत इशारा देताना म्हटले आहे की, जागतिक कर्जाची ही स्थिती इतकी भयंकर आहे की आर्थिक घडी विस्कटल्याने अनेक देशांना कर्ज फेडणेच कठीण होणार आहे. यामुळे जग भयंकर आर्थिक मंदीत लोटले जाऊ शकते.


आयएमएफ दर सहा महिन्यांनी वित्तीय पत अहवाल जाहीर करते. बुधवारी याबाबत जाहीर झालेल्या अहवालानुसार, २०१६ मध्ये जागतिक पातळीवर सरकारी व खासगी कर्ज वाढून ते २०१६मध्ये जागतिक जीडीपीच्या २२५% झाले आहे. यापूर्वी ते २००९ मध्ये अशा उच्चांकी पातळीवर होते. आयएमएफनुसार जगात खासगी कर्ज वेगाने वाढत आहे. विशेषत: चीनमध्ये हे कर्ज अधिक आहे. गेल्या जागतिक मंदीनंतर जगात खासगी कर्ज जितके वाढले आहे त्यात एकट्या चीनचा वाटा तीन चतुर्थांश आहे. या कर्जांमुळे देशांच्या विकास दरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेलाही खीळ बसू शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...