आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील 13% संपत्ती 0.1% श्रीमंतांकडे, 36 वर्षांत 0.01% श्रीमंतांच्या संपत्तीमधील वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- जगातील एकूण संपत्तीच्या १३ टक्के संपत्ती ही सर्वाधिक श्रीमंत असलेल्या ०.१ टक्के लोकांकडे आहे. मागील चार दशकांत जगात जितकी नवीन संपत्ती निर्माण झाली त्यातील २७ टक्के संपत्तीवर उच्च स्तरावरील १% श्रीमंतांचा अधिकार आहे. उर्वरित ७३ टक्के संपत्ती जगातील ९९ टक्के लोकसंख्येत विभागली अाहे. १९८० ते २०१६ पर्यंत म्हणजेच मागील ३६ वर्षांत जगातील ०.०१% श्रीमंतांच्या संपत्तीत झालेली वाढ ही जगातील ५०% गरिबांच्या संपत्तीत झालेल्या वाढी इतकी आहे. फ्रान्सचे अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेट आणि त्यांच्या १०० सहकाऱ्यांच्या संशोधन पथकाने १९८० ते २०१६ पर्यंतच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार केला.  यात १९८० ते आजपर्यंत निर्माण झालेल्या नवीन संपत्तीपैकी ४ टक्के संपत्तीवर ०.००१ टक्के (७६ हजार) श्रीमंतांचा अधिकार आहे. जगातील प्रमुख एक टक्के श्रीमंतांच्या संपत्तीचा हिस्सा २०५० पर्यंत ३ ते ५ टक्क्यांवर वाढेल. तर गरीब असलेल्या ५० टक्के लोकसंख्येच्या संपत्तीचा हिस्सा २ टक्के कमी होईल. 

 

भारतात १० % श्रीमंत लाेकांकडे ५५% हिस्सा  
भारतातील प्रमुख १० टक्के श्रीमंतांकडे देशातील एकूण संपत्तीच्या ५५ टक्के हिस्सा आहे. १९८० मध्ये हा आकडा ३१ टक्क्यांवर होता. अमेरिकेतील प्रमुख १० टक्के श्रीमंतांकडे एकूण देशातील एकूण संपत्तीच्या ४७ टक्के हिस्सा आहे. रशियात हा आकडा ४६ टक्के, चीनमध्ये ४१ टक्के आणि अाफ्रिकन देशात ५५ टक्क्यांपर्यंत आहे.  

बातम्या आणखी आहेत...