आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकीर नाईकचे प्रत्यार्पण केले जाणार नाही; मलेशियाच्या पंतप्रधानांचा पवित्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालम्पूर- मलेशियाचे पंतप्रधान महातिर माेहंमद यांनी भारतविरोधी पवित्रा घेतला आहे. कट्टरवादी इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकचे भारताला प्रत्यार्पण करण्यास त्यांनी नकार दिला. राजधानी पुत्रजयामध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. 


ते म्हणाले, झाकीर नाईकमुळे देशासमोर सध्या कोणताही धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे प्रत्यर्पण केले जाणार नाही. परंतु झाकिरला मलेशियाचे नागरिकत्व मिळालेले आहे. भारताने जानेवारीत मलेशियाकडे नाईकला सोपवण्याची मागणी केली होती. 


नाईकवर देशात दहशतवादी कारवायांसाठी तरूणांना भडकवण्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास दल व दक्षता संचालनालय त्याच्या विरोधात तपास करत आहे. झाकिर नाईक २०१६ मध्ये भारतातून फरार झाला होता. दरम्यान, नाईकच्या प्रत्यर्पणासंबंधी भारताच्या विनंतीवर मलेशिया सरकार विचार करत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी दिली होती. त्याचवेळी भारतात येण्याबद्दलच्या बातम्या नाईकने फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान, मलेशियाने त्यास स्थायी स्वरूपात राहण्याची परवानगी दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...