आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीच्या बॉम्बहल्ल्यांमध्ये आफ्रिन येथील 13 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरुत- तुर्कीच्या फौजांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये सिरियाच्या आफ्रिन क्षेत्रातील जन्दिरिस शहरातील १३ जण ठार झाले. युद्धावर निगराणी ठेवणाऱ्या मानवाधिकार संघटनेने २२ जण ठार झाल्याचे म्हटले आहे. कुर्दिश मिलिशियाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उशिरा हा हल्ला झाला. कुर्दिशांच्या बंडखोरीला तुर्कीने दहशतवाद असेच संबोधले आहे. आफ्रिन येथील या संघटनेचा तळ उद्ध्वस्त करण्याचे धोरण जानेवारीपासूनच तुर्कीने आखले होते.  सिरियन कुर्दिश संघटना वायपीजी मिलिशियाचे प्रवक्ते रोजहाट रोज यांनी सांगितले की, हल्ल्यामध्ये ३ अल्पवयीन आहेत. येथील राजो गाव आणि आफ्रिन शहरादरम्यान तुर्कीने बॉम्ब हल्ले केले. ब्रिटिश निगराणी समूहाने म्हटले आहे की, तुर्कीने केलेल्या हवाई हल्ल्यात आफ्रिन क्षेत्रातील १७ नागरिक ठार झाले, तर ९२ जण जखमी आहेत. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...