आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 9 ninth Day Of Diagnosis Of Cancer; 10 Weeks Ago 5th Surgery, Gold In Paralympic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याचे नवव्यांदा निदान; 10 आठवड्यांपूर्वी 5वी शस्त्रक्रिया, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगचेंग- नेदरलँडच्या बिबियन मेंटल हिने विंटर पॅरालिम्पिकमध्ये स्नोबोर्डिंग क्रॉसचे सुवणपदक जिंकले. तिची ही कहाणी केवळ खेळ किंवा यशापुरती मर्यादित नाही. तिची जिद्द आणि धाडस याच्याशी तिचे यश जोडून पाहावे लागेल. तिची ही कहाणी समजून घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच्या काळातील घडामोडींकडे पाहावे लागेल. गेल्या जानेवारीमध्ये जेव्हा खेळाडू विंटर पॅरालिम्पिकची तयारी करत होतेत तेव्हा बिबियन स्पी कॅन्सरशी झुंज देत होती. तिच्यावर किमोथेरपी सुरू होती. तिला नवव्यांदा हा कॅन्सर झाला होता. थकवा खूप होता, परंतु बिबियनच्या डोक्यात पॅरागेम्स घोळत हाेते. शेवटी फेब्रुवारीमध्ये ती आपल्या स्नोबोर्डवर स्वार झाली. ४५ वर्षीय बिबियन ३ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर प्योंगचेंगला पोहोचली. जिद्दीने तिने सुवर्णपदक पटकावले. एवढेच नव्हे तर, स्नोबोर्डमध्ये सलग दोन वेळा पॅरालिम्पिकचे सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली खेळाडू ठरली. बिबियनने १९९३ मध्ये स्नोबोर्डिंगचा सराव सुरू केला होता. सहा वेळा ती राष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरली. मात्र, १९९९ मध्ये तिला घशाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅन्सरवर मात करत ती २००२ मध्ये विंटर गेम्समध्ये पात्र ठरली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिच्या घोट्यात बोन ट्यूमर असल्याचे लक्षात आले. 

 

शस्त्रक्रियेनंतरही फार फरक पडला नाही. तिचा एक पाय कापावा लागला. पाय कापल्यावरही एका महिन्यात ती परत ट्रॅकवर परतली. यानंतरच्या काळात बिबियनला आठ वेळा कॅन्सर झाला. पाच वेळा शस्त्रक्रिया झाली. ४५ वर्षीय बिबियन प्रेरक वक्त्याही आहेत. त्यांनी २०१२ मध्ये ‘मेंटॅलिटी फाउंडेशन’ची स्थापना केली होती. दिव्यांग खेळाडूंना ही संस्था मदत करते.

 

विश्रांती नव्हे, खेळच मला मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम करतात : बिबियन

बिबियन म्हणते, शस्त्रक्रियेनंतर जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा पर्याय माझ्यासमोर होता. डॉक्टरसह सर्वांनीच हा सल्ला दिला होता. मात्र, पूर्ण तंदुरुस्त व्हायचे असेल तर प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल, हे मी जाणून होते. त्यासाठी खेळाशिवाय दुसरा उपाय नव्हता. म्हणूनच मी लगेच ट्रॅकवर आले. हा खेळच मला खरी शक्ती प्रदान करत आहे.