आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Slim होण्याच्या नादात बनली होती हाडांचा सापळा, अशी बदलली LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनची एमिली लुइस जेव्हा 15 वर्षांची होती तेव्हा तिचे वजन 30 किलोंपेक्षा कमी झाले होते. ती अक्षरशः हाडांचा सापळा बनली होती. तिला अॅनरॉक्सिया नावाचा आजार झाला होता. कमी होत जाणाऱ्या वजनामुळे तिला 7 वेळा रुगणालयात दाखल करावे लागले होते. अशक्तपणा आणि कमी होत जाणाऱ्या वजनामुळे डॉक्टरांनीही तिच्या पालकांना सतर्क केले. केक किंवा आइसक्रीम तर सोडाच जेवल्यानेही आपण जाड होऊ अशी भिती तिला वाटत होती. याच भितीमुळे, तिची अशी अवस्था झाली होती. 

 

> आजकालच्या सिलेब्रिटीज आणि मॉडेल्सचा आदर्श घेऊन लोक स्लिम-ट्रिम होण्यासाठी काहीही करायला तयार होतात. अशात उपाशी राहण्यापासून तासंतास जिममध्ये घालवण्यापर्यंतचे खटाटोप करून काहींवर हाडांना कातडी चिटकण्याची वेळ येते. 
> थोडेफार स्लिम होण्याचा प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. पण, काहीही खालल्यास आपण जाड होतो की काय या भितीने जेवण सोडणे हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या अवस्थेत जाणाऱ्यांच्या हाडांना अक्षरशः कातडी चिटकते. याच अवस्थेला अनरॉक्सिक आजार असे संबोधले जाते.
> एमिली स्वतःला स्लिम आणि स्लिम करण्यासाठी सकाळी फिरायला निघायची. यानंतर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत बसणार नाही असे संकल्प तिने घेतला होता. केक, आइसक्रीम आणि गोड पदार्थांसह जेवण सुद्धा तिला विष वाटायचे. कमी होत जाणाऱ्या वजनामुळे तिच्यावर लहान मुलांचे कपडे घालण्याची वेळ आली होती.

 

इंस्टाग्रामने बदलले आयुष्य...
उपचार आणि अशक्तपणाला कंटाळल्यानंतर तिला आपण स्लिम होण्याची हद्द पार केल्याचे लक्षात आले. इंस्टाग्रामवर अॅनरॉक्सिया आजारातून बरे होणाऱ्या लोकांचे अकाउंट पाहून तिला प्रेरणा मिळाली. हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हापासून तिने व्यायामासह सकस आहार सुरू केला. कित्येक वर्षे आपल्या डायटवर पुरेपूर लक्ष दिले. आता 22 वर्षांची असलेली एमिली मानसोपचाराचे शिक्षण घेत आहे. एवढेच नव्हे, तर स्वतः ती लोकांना आहे तशीच बॉडी स्वीकार करण्याचे सल्ले देते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, एमिलीच्या रिकव्हरीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...