आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्युबात कॅस्ट्रो युगाची समाप्ती, 58 वर्षांनंतर पहिल्यांदाच झाले सत्तेबाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाना - क्युबामध्ये सहा दशकांपासून सत्तेवर असलेल्या कॅस्ट्रो युगाची समाप्ती झाली आहे. गुरुवारी क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी राजीनामा दिला. कॅस्ट्रो यांची जागा आता उपराष्ट्राध्यक्ष मिगेल डियाझ कनेल घेतील. गुरुवारी क्युबाच्या नॅशनल असेंब्लीने कनेल यांच्या नामांकनावर मतदान केले. त्यात कनेल राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित असल्याचे मानले जाते. 

 
५७ वर्षीय कनेल कम्युनिस्ट पार्टीच्या सर्वोच्च नेत्यांपैकी आहेत. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा  उपराष्ट्राध्यक्ष झाले होते. क्युबामध्ये १९५९ च्या क्रांतीनंतर कॅस्ट्रो कुटुंबाशी संबंध नसलेले व या पदावर विराजमान होणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत.  या अगोदर फिडेल कॅस्ट्रो व त्यांचे धाकटे बंधू राऊल कॅस्ट्रो यांनीच देशाची सूत्रे सांभाळली होती. ८६ वर्षीय राऊल २००६ मध्ये देशाचे प्रमुख बनले होते. त्यांनी थोरले बंधू फिडेल यांच्या आजारपणामुळे हे पद स्वीकारले होते.  

 

मिगेल डियाझ कनेल : राऊल कॅस्ट्रोंचा उजवा हात  
नवीन राष्ट्राध्यक्ष मिगेल डियाझ कनेल यांचा जन्म एप्रिल १९६० मध्ये झाला. १९५९ मध्ये तरुण फिडेल कॅस्ट्रो देशाचे पंतप्रधान बनले होते. तेव्हा कनेल यांचे अभियांत्रिकी शाखेत शिक्षण झाले आहे. तरुणपणीच ते राजकारणात सक्रिय झाले. कनेल २०१३ मध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाले होते. खरे तर तेव्हा त्यांना जास्त लोकप्रियता नव्हती. परंतु नंतर ते कॅस्ट्रोंचा उजवा हात बनले होते. गत पाच वर्षांपासून राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांची मनधरणी केली जात होती.

 

पुढे राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे  कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्षपद  
राऊल कॅस्ट्रो यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर साम्यवादी क्युबाच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती बनले. २०२१ मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत पक्षाच्या अध्यक्षस्थानी राहतील. त्यामुळेच क्युबाची वास्तविक सत्ता कॅस्ट्रो यांच्याच हाती राहणार आहे. क्युबात मार्चमध्ये झालेल्या नॅशनल असेंब्लीसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व ६०५ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.  

 

आव्हान अर्थव्यवस्थेला मंदीतून  सावरण्यासाठी बदल घडवणे  
क्युबाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कनेल यांच्यासमोर अनेक नवी आव्हाने असतील. क्युबाच्या अर्थव्यवस्थेला प्रदीर्घ काळापासून घरघर लागली आहे. देशातील तरुण लोकसंख्येला परिवर्तन हवे आहे. क्युबाचे सर्वात घनिष्ठ राष्ट्र व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. त्यामुळे कनेल यांच्यासमोर अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध निर्माण करणेही महत्त्वाचे ठरेल.  

 

निवडणूक नॅशनल असेंब्लीच्या ६०५ सदस्यांमार्फत निवड  
क्युबाच्या नॅशनल असेंब्लीला सामान्यपणे रबर स्टॅम्प असे मानले जाते. गुरुवारपासून नॅशनल असेंब्लीच्या नवनिर्वाचित ६०५ सदस्यांच्या शपथग्रहणासाठी बैठक सुरू झाली. असेंब्लीच देशाची सत्ता सूत्रे सांभाळणाऱ्या राष्ट्रीय परिषदेला निश्चित करते. या परिषदेचे अध्यक्ष देशाचा राष्ट्राध्यक्ष असतो. क्युबाच्या मते त्याची निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र व नि:पक्ष आहे. परंतु त्यावर विश्लेषक कायम प्रश्नचिन्ह लावत आले आहेत.  

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...