आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये पाच दिवसांची सांबा परेड; देशातील एक कोटी लोक,विदेशातील 15 लाख सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दी जानेरिओ- ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओत ५ दिवसांचा रिओ कार्निव्हल सुरू झाली आहे. ब्लॉको स्ट्रीटवर रविवारी परेडची १०० वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी ४५० पेक्षा जास्त बँडसह हजारो लोकांनी नृत्य करत सांबा परेड काढली. ती पाहण्यासाठी विदेशातून ४ लाख लोकांसह १२ लाखांवर लोक रिओत पोहोचले. पर्यटन संस्थेनुसार, यंदा सांबा परेडमध्ये विदेशातून १५ लाखांवर लोक ब्राझीलला येतील, अशी अपेक्षा आहे. पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा ५०% जास्त आहे. 

 

अर्थव्यवस्था : ७२ हजार कोटी रु. मिळणार  

ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी विदेशी नागरिकांची रांग लागली आहे. रिओचे हॉटेल्स, फ्लाइट्स डिसेंबरमध्येच बुक झाल्या आहेत. कार्निव्हलनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत ७२ हजार कोटींची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ती २०१७ च्या तुलनेत दुप्पट होईल.  

 

या वर्षी नवे: लिंग समानतेची मागणी  

सांबा परेडमध्ये सहभागी होणाऱ्या गटाने या वेळी लिंग समानतेसह लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. मात्र, सामाजिक, राजकीय मुद्द्यांची झलक गायब राहिली.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, परेडचा इतिहास ... 

बातम्या आणखी आहेत...