आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत लुटारूंनी भारतीय विद्यार्थ्यावर झाडल्या गोळ्या; तेलंगणाच्या शरत कोप्पूचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील मिसोरी प्रांतात कन्सास शहरातील एका रेस्तराँमध्ये लुटारूंनी केलेल्या गोळीबारात २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी शरत कोप्पूचा मृत्यू झाला. तेलंगणातील वरंगल जिल्ह्यातील रहिवासी शरत मिसोरी विद्यापीठात एमएसच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. 


शरतच्या मित्रांनी शनिवारी फोनवर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. जेस फिश अँड चिकन मार्केटमधील रेस्तराँमध्ये शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लुटारूंनी शरतवर पाठीमागून गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी तो रेस्तराँच्या दिशेने पळाला पण वाचू शकला नाही. शरत रेस्तराँमध्ये पार्टटाइम नोकरी करत होता. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...