आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टॉकहोम- पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर सोमवारी रात्री उशिरा स्वीडनची राजधानी स्टॉकहोमला पोहोचले. मोदी यांचा दौरा १६ ते २० एप्रिलपर्यंत आहे. ते ब्रिटन व जर्मनीलाही जातील. मोदी ३० वर्षांनंतर स्वीडनला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. याआधी राजीव गांधी गेले होते. पंतप्रधान ब्रिटनमध्ये राष्ट्रकुल देशांच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेत (चोगम) भाग घेतील. विशेष म्हणजे या परिषदेत केवळ मोदी यांना लिमोझिन कारने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मोदी २० एप्रिलला काही वेळ जर्मनीत थांबतील. तिथे ते जर्मन चान्सलर अंगेला मर्केल यांच्याशी चर्चा करतील.
युरोपला रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी केलेल्या टि्वटमध्ये सांगितले की, ते व्यापार व स्वच्छ ऊर्जेसह विविध क्षेत्रांत स्वीडनसोबतच्या द्विपक्षीय भागीदारीबाबत आशादायी आहेत. फेसबुकवर पोस्टवर लिहिले की, भारत-स्वीडनमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमची भागीदारी लोकशाही मूल्ये तसेच खुल्या, सर्वसमावेशक व नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेबद्दलच्या वचनबद्धतेवर बेतलेली आहे.
स्वीडन दौरा : भारत-नॉर्डिक परिषद, ५ देशांसोबत द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान मोदी १६ व १७ एप्रिलला दोन दिवस स्वीडनमध्ये राहतील. तिथे ते स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी चर्चा करतील. यानंतर पहिल्या भारत-नाॅर्डिक परिषदेत भाग घेतील. यामध्ये सर्व नॉर्डिक देश सहभागी होत आहेत. परिषदेत डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, नॉर्वे व स्वीडनचे पंतप्रधान सहभागी होतील. स्कँडिनेव्हिया बेटात उत्तर युरोपमध्ये येणाऱ्या देशांना नॉर्डिक देश संबोधले जाते. मोदी १७ एप्रिलला डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा करतील.
भारत-स्वीडनमध्ये १.९ अब्ज डॉलरचा व्यापार
भारत व स्वीडनमध्ये २०१६-१७ मध्ये १.७ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. याआधी हा २.१७ अब्ज डॉलर होता. दोन्ही देशांनी येणाऱ्या काळात ५ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वीडनच्या १७० कंपन्या भारतात काम करत आहेत. भारताच्या स्वीडनमध्ये ७० कंपन्या आहेत. नॉर्डिक देशांसोबत भारताचा व्यापार ५.३ अब्ज डॉलर आहे. या देशांची भारतात २.५ अब्ज डॉलर एफडीआय भागीदारी आहे.
९ वर्षांनंतर काॅमनवेल्थ संमेलनास जाणारे माेदी असतील पहिले पीएम
१८ एप्रिलला माेदी हे ब्रिटनला जातील. तेथे राजकुमार चार्ल्स व माेदी हे अायुर्वेद प्रदर्शनात सहभागी हाेतील. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. माेदी तेथे राष्ट्रकुल देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या शिखर संमेलनातही सहभागी हाेतील. २००९नंतर या संमेलनात जाणारे माेदी हे पहिले भारतीय पंतप्रधान अाहेत. त्यात काॅमनवेल्थचे ५३ सदस्य देश संधी, अाव्हाने, लाेकशाही व शांती-समृद्धी याबाबत अापापली भूमिका मांडतील. यासह पंतप्रधान माेदी हे महाराणी एलिझाबेथ यांचीदेखील भेट घेतील.
नरेंद्र माेदी दुसऱ्यांदा ब्रिटन, तर चाैथ्यांदा जर्मनीला जाणार
स्वीडनचा दाैरा हा पंतप्रधान माेदींचा या वर्षाचा सहावा विदेश दाैरा अाहे. यापूर्वी त्यांनी पाच देशांचा दाैरा केला अाहे. ते ब्रिटन व जर्मनीलाही जातील. ते दुसऱ्यांदा ब्रिटनला जातील. यापूर्वी २०१५मध्ये तेथे गेले हाेते. तसेच माेदी हे चाैथ्यांदा जर्मनीलाही जातील.
एलिझाबेथ करू शकतात पदत्याग; भारत होऊ शकताे राष्ट्रकुलचा प्रमुख
राष्ट्रकुल देशांतील सरकार प्रमुखांच्या बैठकीपूर्वी चर्चा सुरू अाहे की, महाराणी एलिझाबेथ यांची हे पद साेडण्याची इच्छा अाहे. एलिझाबेथ (९२) यांची घटती सक्रियता, हे यामागील कारण असल्याचे सांगितले जात अाहे. राष्ट्रकुलचे प्रमुखपद अानुवंशिक नाही. त्यामुळे भारत राष्ट्रकुलात माेठी भूमिका पार पाडण्याची तयारी करत अाहे. माेदी हे भारताचे वित्तीय याेगदान दुप्पट करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.