आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘द. कोरियाच्या मदतीने इतिहासलेखन करणार’; हुकूमशहा किम जोंग उन यांची इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारत असल्याचे खुद्द उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी म्हटले आहे. हिवाळी ऑलिम्पिकनिमित्त उ. कोरियाचे प्रतिनिधी मंडळ द. कोरियाला गेले होते. त्यानंतर आपल्या शेजारी देशाच्या सहकार्याने आपल्याला कोरियाचा इतिहास नव्याने लिहिण्याची इच्छा असल्याचे किम यांनी म्हटले आहे. दोन्ही कोरियांची पाळेमुळे समान असून संयुक्त इतिहासलेखन होणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.  


द.कोरियाचे सुरक्षा प्रमुख च्युंग इयू योंग यांनी उ. कोरियाला भेट दिली.त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर उन यांनी आपली भूमिका मांडली आहे. २०११ मध्ये किम जोंग उन सत्तेत आले होते. त्यानंतर त्यांनी प्रथमच द. कोरियाच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींशी चर्चा केली. 

 

किम यांनी सपत्नीक केले द. कोरियाच्या प्रतिनिधींचे स्वागत  
द. कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाच्या सन्मानार्थ आयोजित रात्रभोजनाच्या कार्यक्रमात किम जोंग उन स्वत: सपत्नीक हजर राहिले. दोन्ही देशांतील संबंधांसाठी ही बाब सर्वाधिक सकारात्मक ठरली, असे सेऊलच्या सूत्रांनी सांगितले. वर्कर्स पार्टीच्या मुख्यालयाला प्रथमच द. कोरियाच्या प्रतिनिधींसाठी खुले करणे ही बाबदेखील चकित करणारी अाहे.

बातम्या आणखी आहेत...