आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेतील एका चर्चने आयोजित केली बंदूक प्रार्थना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेनसिल्व्हेनिया- अमेरिकेच्या फ्लोरिडामधील शाळेत गोळीबार झाल्यानंतर १५ दिवसांनीच एका चर्चने आगळ्या प्रार्थना सभेचे आयोजिन केले होते. देशाची बंदूक संस्कृती साजरी करण्यासाठी आयोजित या प्रार्थना सभेत सहभागी होणाऱ्या सर्व लोकांना आपापल्या बंदुका घेऊन यायचे होते.

 

पेनसिल्वेनियाच्या या चर्चमध्ये बंदूक-प्रार्थनेसाठी १०० वर लोक आले होते. कोणी एके-४७,तर कोणी धोकादायक एआर-१५ रायफल आणली होती. ज्यांच्याकडे बंदूक नव्हती त्यांनी बंदुकीच्या दुकानात जा आणि ७०० डॉलर देऊन एक शपथपत्र आणा असे निर्देश होते. आपण भविष्यात लवकरात लवकर बंदूक घेऊ असे या शपथपत्रात लिहिलेले असावे. हे शपथपत्र दाखवूनच बंदूक-प्रार्थनेत सहभागी होता येईल, असे सांगण्यात आले होते. प्रार्थनेत सहभागी झालेले लोक वेगवेगळ्या शस्त्रांनीच मेकअप करून आले होते. संपूर्ण पेनसिल्वेनिया राज्यात या प्रार्थनेला विरोध होत आहे. ‘आम्हाला देवाची पूजा करायची आहे, शस्त्रांची नाही,’ अशी घोषणा हाती घेऊन लोक निदर्शने करत आहेत.


गेल्या १४ फेब्रुवारीला फ्लोरिडात एका बंदूकधारी युवकाने शाळेवर हल्ला केला होता. त्यात १७ जण ठार झाले होते. त्यानंतर १५ दिवसांतच आयोजित अशा प्रकारच्या प्रार्थनेमुळे लोक संतप्त आहेत. अमेरिकेत बंदूक-संस्कृतीमुळे हिंसाचार वाढला आहे. अमेरिकेच्या ४०% घरांत बंदुका आहेत. त्यामुळे होणाऱ्या हिंसेत दरवर्षी किमान १५ हजार ठार होतात. बराक ओबामा अध्यक्ष होते तेव्हापासूनच बंदूक संस्कृतीच्या विरोधात कठोर कायदा आणण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...