आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्याची मालमत्ता जप्त करून कर्ज वसुली शक्य; ब्रिटिश कोर्टाची परवानगी, भारतीय बँकांना दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याविरुद्ध इंग्लंडच्या कोर्टात खटला लढत असलेल्या भारतीय बँकांना मोठे यश मिळाले आहे. तेथील एका हायकाेर्टाने १३ बँकांच्या समूहाला लंडनजवळील हर्टफोर्डशायरमध्ये मल्ल्याच्या मालमत्तेत प्रवेशाची परवानगी दिली आहे. बँकांकडून ब्रिटिश एन्फोर्समेंट अधिकाऱ्याला हा अधिकार असेल. या आदेशानुसार कर्जाची वसुली करण्यासाठी बँका ही मालमत्ता ताब्यात घेऊ शकतात. मल्ल्यावर बँकांची १३,९०० कोटींची थकबाकी आहे. 


हायकोर्टाच्या क्विन्स बेंच डिव्हिजनने २९ जूनला सुनावलेला हा निकाल आता समोर आला आहे. त्यानुसार अधिकारी गरज भासल्यास बळाचाही वापर करू शकतात. मल्ल्याने या निकालाविरुद्ध अपील केले असून त्यावर लवकरच सुनावणी होईल. याआधी मे मध्ये जगभरातील आपली मालमत्ता गोठवण्याचा आदेश संपुष्टात आणण्याची मागणी करणारी मल्ल्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली होती. ब्रिटिश कोर्टाने भारताच्या डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलचा निर्णय योग्य ठरवत भारतीय बँकांना त्यांचे पैसे वसूल करण्याचा हक्क असल्याचे म्हटले होते. इंग्लंडमध्येही मल्ल्या जामिनावर आहे. त्याला एप्रिलमध्ये अटक झाली होती. मात्र तत्काळ जामीनही मिळाला होता. त्याची वैधता ३१ जुलैला संपत आहे. भारतात मल्ल्यावर फसवणूक अाणि मनी लाँडरिंगचा खटला सुरू अाहे. 


बँकांना आणखी पर्याय 
कायदेतज्ज्ञांनुसार, कोर्टाने एन्फोर्समेंट अधिकाऱ्याला मल्ल्याच्या मालमत्तेत घुसण्याचा अधिकार नव्हे बँकांना एक पर्याय दिला आहे. आता बँकांना गरज वाटल्यास त्या मल्ल्याची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतात. या मालमत्तेवरील सर्व गोष्टी अधिकारी आपल्या नियंत्रणात घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...