आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांना तामिळी अस्मितेविषयी आस्था नाही; मंत्री डी. जयकुमारांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- रजनीकांत यांना तामिळी अस्मितेविषयी व भाषेविषयी आस्था नसल्याचे मत तामिळनाडूचे मत्स्यविकास मंत्री डी. जयकुमार यांनी मांडले आहे. तामिळी मुलांनी आपल्या पालकांना मम्मी-पप्पा म्हणावे. अम्मा - अप्पा नव्हे, अशी रजनीकांत यांची इच्छा आहे.  ही टीका डी. जयकुमार यांनी केली. तामिळ विरुद्ध हिंदी, संस्कृत वादाने तामिळनाडूत सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. जयकुमार यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली.  


सोमवारी येथील एका महाविद्यालयात बोलताना रजनीकांत यांनी भाषेविषयी भूमिका मांडली होती. मुलांनी इंग्रजी अात्मसात करण्याला रजनीकांत यांनी समर्थन दिले होते. याविरुद्ध मत प्रसिद्ध कलाकार व कमल हसन यांनी मांडले. तामिळ बोलले तर ती भाषा विकसित होईल, अशी भूमिका कमल यांनी मांडली होती. 

 

कमल विरुद्ध रजनीकांत
कमल हसन यांनी भाषण करताना शुद्ध तामिळ भाषेचा वापर केला आहे. यात इंग्रजीचे शब्द वापरण्याचे ते कटाक्षाने टाळत आहेत. याउलट स्वत:ला ‘पाचाई तामिझान ’ शुद्ध तामिळी म्हणवणाऱ्या रजनीकांत यांनी ‘तांगलिश’ (इंग्रजीमिश्रित तामिळ) चा वापर वेळोवेळी केला आहे. भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपसात इंग्रजी बोलावे असेही आपल्या भाषणात रजनीकांत म्हणाले.  त्यामुळे आता तामिळी जनता या दोन्ही उगवत्या नेत्यांमध्ये तुलना करू लागली आहे. 

बातम्या आणखी आहेत...