आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सिकोच्या टुल्पेटिकमध्ये फटाका कारखान्यात एका पाठोपाठ अनेक स्फोट, 19 ठार, 40 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिको सिटी - मध्य मॅक्सिकोच्या टुल्पेटिकमध्ये एका फटाका फॅक्टरीमध्ये एकापाठोपाठ झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, एकापाठोपाठ स्फोट झाल्याने मदत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या स्फोटामुळे हानी झाली आणि त्यापैकी काही जणांचाही मृत्यू झाला. टुल्पेटिक शहरात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी 9:30 वाजता पहिला स्फोट झाला. त्यानंतर आग इतर गोदामांपर्यंत पोहोचली. स्फोटांच्या कारणांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस आणि अग्निशमन विभागाचे 100 हून अधिक कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतांमध्ये अग्निशमन दलाचे 4 आणि पोलिसांच्या 5 जवानांचाही समावेश आहे. 


यापूर्वीही झाले आहे असे अपघात 
65 हजार लोकसंख्या असलेले टुल्पेटिक शहर फटाका व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. पण याठिकाणी यापूर्वीही अपघात झालेले आहेत. डिसेंबर 2016 मध्येही याठिकाणी फटाक्यांच्या बाजारात मोठी आग लागली होती. त्यात 42 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 70 हून अधिक लोक जखमी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...