आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियाने शत्रुत्व संपवावे- किम यो जोंग; हिवाळी ऑलिम्पिक दौऱ्याचा समारोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गँगनुंग (द. कोरिया)- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांचा द. कोरिया दौरा नुकताच संपला. त्या सोमवारी मायदेशी परतल्या. हिवाळी ऑलिम्पिकनिमित्त त्या ३ दिवसीय द. कोरिया दौऱ्यावर होत्या. ७० वर्षांच्या तणावानंतर दोन्ही कोरियांमध्ये या दौऱ्यामुळे राजनयिक संवादाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. दक्षिण कोरिया चर्चेतून तणाव सोडवू इच्छित असल्याने त्यांनी किम यो जाेंग यांच्या भेटीला सकारात्मक मानले आहे. किम उन जोंग यांच्या खासगी विमानातून किम यो जाेंग व त्यांचे प्रतिनिधी मंडळ द. कोरियात आले होते. 

 

सेऊल येथील राष्ट्राध्यक्ष भवनात त्यांनी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन यांच्याशी चर्चा केली. द. कोरियाचे पंतप्रधान ली नाक योन यांनी उ. कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. तसेच मून यांच्या चीफ ऑफ स्टाफने समारंभापूर्वी त्यांच्यासाठी खास रात्रभोजनाचे आयोजन केले होते. ३० वर्षीय किम यो जोंग यांचा आपल्या भावाच्या मंत्रिमंडळात मोठा प्रभाव आहे.  


आंतरराष्ट्रीय समुदायासमोर किमचे शक्तिप्रदर्शन

आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही उ. कोरियाच्या विशेष मागण्या द. कोरियाने मान्य केल्या. १०० पेक्षा अधिक कलाकारांचा ताफा समुद्रमार्गाने द. कोरियाला येईल, अशी मागणी उ. कोरियाने केली होती. तीदेखील मून जाए इन यांनी मान्य केली. उ. कोरियाच्या समुद्रभ्रमणावर आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्बंध घातले असूनही हे कलाकार जहाजाने येथे दाखल झाले. हिवाळी ऑलिम्पिकनिमित्त आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला जुमानतच नसल्याचे किम जोंग उन यांनी दाखवून दिले.

 

मला अशा स्वागताची अपेक्षा नव्हती 
मला स्थिती बिकट वाटली होती. मात्र द. कोरियात आल्यानंतर मला अशा स्वागताची अपेक्षा नव्हती, असे किम यो जोंग म्हणाल्या. माझा दौरा तडकाफडकी ठरला होता. मात्र दोन्ही देशांतील स्थितीमध्ये साम्य आहे याची जाणीव मला येथे आल्यावर झाली, असे  रात्रभोजनावेळी त्या बोलल्या. दोन्ही कोरियांत मैत्री होण्याची मला अपेक्षा आहे. दरम्यान, दोन्ही कोरियांत मैत्री होईल असे ठामपणे आताच सांगता येणार नाही, असे अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी म्हटले आहे. ऑलिम्पिकनंतर स्थिती विपरीतही असू शकेल, असे मॅटिस म्हणाले.  

 

बातम्या आणखी आहेत...