आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये ‘टेक्नोसॅव्ही’ मंत्रिमंडळ; परराष्ट्र संबंध, संरक्षण, अर्थ मंत्रालयामध्ये महत्त्वाचे बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांनी नव्या मंत्रिमंडळाची घोषणा सोमवारी केली. परराष्ट्रमंत्री पदावरून वांग ली यांची पदोन्नती झाली असून आता ते स्टेट कौन्सिलरपदी आले आहेत. त्यामुळे भारतासाठी हा सजगतेचा इशारा मानण्यात येत आहे. वांग भारत-चीन संबंध, अण्वस्त्र विषयांचे तज्ञ आहेत. नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी)  या चीनमधील संसदेने नव्या मंत्रिमंडळ नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. उपपंतप्रधान म्हणून ४ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. हान झेंग, स्यून च्युनलान, हू च्युनहुआ, लीयू हे उपपंतप्रधानपदी नियुक्त झाले आहेत. या नावांना एनपीसीच्या ३००० सदस्यांनी मान्यता दिली आहे.  


शी जिनपिंग यांची गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ही त्यांची दुसरी कारकीर्द आहे. जिनपिंग यांच्या खास मर्जीतले वांग क्विशान यांची उप राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. उपपंतप्रधानपदी नियुक्ती झालेले लीयू हे यांचे चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. जगातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतेला मजबूत करण्यात लीयू यांचा वाटा मोठा आहे. गेल्या ३० वर्षांत चीनच्या अर्थव्यवस्थेत दुपटीने वाढ झाली आहे.  

 

भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या नियुक्त्या  
चीनचे परराष्ट्रमंत्री असलेले वांग यी यांची नियुक्ती आता स्टेट कौन्सिलर म्हणून झाली आहे. मुत्सद्देगिरीतील हे चीनमधील सर्वोच्च निर्णयाचे पद आहे. ६५ वर्षीय वांग हे परराष्ट्रमंत्रिपदीही कायम राहतील.  भारताच्या दृष्टीने दुसरी महत्त्वाची नियुक्ती लेफ्ट. जन. वेई फेंग यांची आहे. त्यांना संरक्षणमंत्रिपदी नियुक्त केले आहे. चीनचे लष्कर विद्युतगतीने आधुनिक करण्यामागे वेई फेंग हे प्रमुख सूत्रधार मानले जातात. त्यांनी चीनच्या क्षेपणास्त्र ताफ्याला सक्षम केले आहे. रॉकेट दल आणि स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (सायबर, इलेक्ट्रॉनिक, अंतराळ विज्ञान)  अशा तीन स्तरांवर त्यांनी चीनच्या सैन्याचा विकास केला आहे. 

 

उल्लेखनीय काम करणाऱ्यांना संधी  
- चेन वेनकिंग यांच्याकडे गृह खाते देण्यात आले आहे. दहशतवादविरोधी मोहिमांची जबाबदारी चेन वेनकिंग यांच्याकडेच असेल.  
- यी गांग यांची नियुक्ती केंद्रीय बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाच्या गव्हर्नरपदी झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून या पदावर झोऊ शिआच्युआन होते. यी गांग यांनी परकीय गंगाजळी वाढवण्यात मोठे योगदान दिल्याने त्यांना पदोन्नती मिळाली आहे.  
- नव्या मंत्रिमंडळात २६ कॅबिनेट मंत्री आणि कमिशन्स (आयोग)  असतील.  
- नैसर्गिक स्रोत विकास, राष्ट्रीय दैवतांचे जतन, आपत्ती व्यवस्थापन अशी ३ नवी मंत्रालये निर्माण करण्यात आली आहेत. सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयांचे एकीकरण केले आहे.  
- चीनने बँक आणि विमा क्षेत्रावरील नियामक मंडळदेखील एकीकृत केले आहे.  
- स्थलांतराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना.  
बातम्या आणखी आहेत...