आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीबीसीवर स्त्री-पुरुष असमानतेचा आरोप, पुरुष सहकाऱ्याला 10 पट जास्त वेतन दिल्‍याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पुरुषाच्या तुलनेत महिला समालाेचकाला कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप बीबीसीवर लावण्यात आला आहे. नऊ वेळा विम्बल्डन किताब जिंकणारी माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाने मागील वर्षीच्या विम्बल्डनमध्ये बीबीसीसाठी समालोचन केले होते. समालोचकांच्या टीममध्ये तीन वेळा विम्बल्डन जिंकणारा जॉन मॅकेनरोचाही समावेश होता. दोघांनीही एकसारखे समालोचन केले असताना जॉनला तिच्या तुलनेत दहा पट अधिक वेतन देण्यात आल्याचा आरोप मार्टीनाने लावला.


मार्टिना म्हणाली की, बिम्बल्डन झाल्यानंतर कळले की एकसारखे समालोचन केले असताना मला केवळ ३ लाख तर जॉनलाला १.३ कोटी रुपये देण्यात आले. जॉन विम्बल्डनमध्ये समालोचन करण्यासह बाहेरच्या कामातही व्यग्र होता. त्या उलट मी केवळ बिम्बल्डनसाठीच काम करत होते. या प्रकरणात नवरातिलोवाचा व्यवस्थापक बीबीसीशी बोलणार असल्याचे तिने म्हटले. दुसरीकडे बीबीसीने म्हटले की, समालोचकांच्या टीममध्ये मार्टिना व जॉनकडे वेगवेगळी जबाबदारी होती. दोघांच्या कार्यक्रमातही खूप फरक होता. जॉनने पूर्ण विम्बल्डनमध्ये एकूण ३० कार्यक्रम केले, तर मार्टिनाने केवळ १० कार्यक्रम केले. प्रेक्षकही जॉनला उत्तम समीक्षक मानतात. त्यामुळे दोघांच्या वेतनात फरक आहे. याचा अर्थ स्त्री-पुरुष असमानता असा होत नाही, असे बीबीसीने स्पष्ट केले. 


मागील वर्षीही बीबीसीच्या एका रेडिओ अँकरने वेतनातील असमानतेवर तक्रार केली होती. मागील १६ वर्षांपासून पुरुष सहकाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

 

बीबीसीत महिलांचे वेतन पुरुषांच्या तुलनेत ९.३% कमी : अहवाल
गार्जियनच्या अहवालानुसार, बीबीसीत पुरुषांच्या तुलनेत  महिलांचे वेतन सरासरी ९.३% कमी आहे. येथील ५०० प्रकरणे अशी आहेत जेथे एकाच कामासाठी पुरुषांना महिलांच्या तुलनेत अधिक वेतन दिले जाते. बीबीसीचे संचालक फ्रॅन अन्सवर्थ यांच्या मते, काही क्षेत्रात असमानता असू शकते. परंतु कंपनी जाणीवपूर्वक असे करत नाही. याचा तपास करू. लंडन विभागातील संपादिका कॅरी ग्रॅसी म्हणाल्या की, जर असमानतेची बाब सत्य ठरली तर राजीनामा देण्याचा मी विचार करीन.

बातम्या आणखी आहेत...