आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकॉनॉमी; फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर बाजारात घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅलन मरे- फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पैसा, बाजार आणि अर्थव्यवस्थेवर लोकांचा अतूट विश्वास कायम ठेवणे. मात्र जेरोम पॉवेल यांनी नव्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला, तेव्हापासून लोकांचा विश्वास ढळू लागला. शेअर बाजार गडगडला.  


डाऊ जोन्समध्ये २ फेब्रुवारी रोजी ६६६ अंक, ५ फेब्रुवारी रोजी ११७५ अंकांची घसरण झाली. ही इतिहासातील सर्वात मोठी घसरण आहे. जे बाजारात नियमित स्वरूपात काम करतात त्यांनी याला गांभीर्याने घेतले नाही. त्यांना बाजारातील चढ-उतार सरावाचे असतात. या घसरणीला त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या ट्विट्सप्रमाणेच सपशेल दुर्लक्षित केले. त्यांना अर्थकारणाचे मूलभूत स्तंभ मजबूत असल्याची जाणीव आहे. बाजार चांगली कमाई करत असल्याबद्दल ते आश्वस्त आहेत. महागाई व व्याजदर कमी आहेत. घाबरायचे का? मात्र पॉवेल आणि तमाम गुंतवणूकदारांनी हे समजून घेतले पाहिजे की, बाजारात टिकून राहणे पूर्वी इतके सोपे नाही.  


गेल्या एक दशकात संपूर्ण जगात इझी मनी (म्हणजे कमी व्याजात मिळालेला पैसा किंवा वाममार्गाने मिळवलेला पैसा) भरपूर आला. चलन धोरणात अभूतपूर्व प्रयोगामुळे यात घट झाली. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे म्हणतात- तुम्हाला कळते की कोण निर्वस्त्र पोहत आहे आणि भरती केव्हा आेसरेल. 

 

निवृत्तांची समस्या वॉल्टर अपडेग्रेव  

ज्येष्ठांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून जोखमीचे दडपण त्यांच्यावर आहे. त्यांच्या बचतीचा पूण मोबदला त्यांना हवा आहे. बाजारात मंदीची चाहुल असून रिअल डील रिटायरमेंट डॉट कॉमचे वॉल्टर म्हणतात, ३ जोखमींची जाणीव ठेवा

 

> १ लाख कोटी डॉलर  रक्कम फेब्रुवारीच्या पहिल्या ५ दिवसांत शेअर बाजारात बुडाली.  

 

चढ-उताराची जोखीम  
बाजारात तेजी असते तेव्हा ही जोखीम सर्वाधिक असते. अशा वेळी गुंतवणुकीचे निर्णय प्रभावित होतात. नुकताच बाजार घसरला तेव्हा चुकीची गुंतवणूक केल्याचे जाणवले. मालमत्ता वाटप योग्य असावे. त्यामुळे शेअरच्या चढ-उताराचा परिणाम निवृत्तीनंतर जीवनावर होत नाही.  

 

चूक योजनेची जोखीम  
बहुतांश लोक निवृत्तीनंतर दीर्घायुष्य लाभल्यास बचत कशी करावी, याचा विचार करत नाहीत. नियोजन फिस्कटते. करिअरदरम्यान भरपूर बचत केली तर निवृत्तीनंतर २० वर्षांनंतरही कामी यावी. निवृत्त होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अनेक खर्चात कपात करावी लागेल.  

 

निवृत्तीनंतर आवकीचे नियोजन  

 

तु म्ही आपल्या बचतीची एक सीमा निश्चित केली असेल. तुमचे बजेट कमी असताना ही रक्कम निश्चित केलेली असू शकते. त्यात वाढ केली नसेल तर त्यावर विचार करा. बाजारात दुप्पट परताव्यासाठी निवृत्तीनंतरचे खाते व्यवस्थित चालेल का, याची पडताळणी करा. जोखमींपासून वाचण्यासाठी तुम्ही निवृत्तीविषयी सजग राहा. रिटायरमेंट इन्कम कॅलक्युलेटर घेऊन आवक, निवृत्ती खात्याचे वर्तमान मूल्य आणि दरवर्षी करण्यात येणारी बचत याचे नियोजन करा.  

बातम्या आणखी आहेत...