आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकोब झुमा यांना पदावरून हटवण्याचा पक्षाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेचा सत्ताधारी पक्ष असलेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने (एएनसी) भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या जॅकोब झुमा यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या अनेक बैठका गेल्या ३ आठवड्यांत घेण्यात आल्या. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर त्यांना पक्षनेतेपदावरून काढावे, असे त्यांच्या समर्थकांचे मत होते. मात्र आता त्यांना काढण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला आहे. दरम्यान, झुमा यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. एएनसीच्या १०७ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. प्रिटोरियाजवळील एका हॉटेलमध्ये तब्बल १३ तास पक्षाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.  


बैठकीचे १३ तास प्रचंड तणावाचे होते. मात्र शेवटी कार्यकारिणीने त्यांना पदावरून काढण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे की, पक्षाची कार्यकारिणी यासंबंधी लिखित आदेश झुमांना पाठवेल. एका स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, पायउतार होण्यासाठी पक्षाने झुमांना ४८ तासांचा अवधी दिला आहे. मात्र पक्षाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला नाही. जॅकोब झुमा यांना पदावरून काढण्यामध्ये एएनसीला काही घटनात्मक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.  


एएनसीचे प्रमुख सिरील रामाफोसा यांनी बैठक सोडून प्रिटोरिया येथील झुमांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. जॅकोबनंतर रामाफोसांकडे सत्ता येण्याची शक्यता अधिक आहे. रामाफोसा जॅकोब यांना पायउतार होण्याची विनंती करत आहेत. दरम्यान, द. आफ्रिकेतील विरोधी पक्षांनी मध्यावधी निवडणुकांची मागणी केली आहे. संसदभंग करण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...