आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियात गायींना शांत राहण्यासाठी आता कुराणातील आयत ऐकवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर- कट्टरवादी मानल्या जाणाऱ्या मलेशियात सरकारने आगळ्या प्रकारचे पाऊल उचलले आहे. बीफचे उत्पादन सुधारण्यासाठी मलेशियाच्या केलान्तन राज्याचे सरकार आता गायींना पवित्र कुराणातील आयत ऐकवणार आहे. राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या मते, कुराणची आयत ऐकल्यानंतर गायींनी शांतता मिळेल. त्यामुळे बीफच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकेल.  


केलान्तनच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य व कृषिमंत्री अब्दुल्ला मतनावीचे यांच्या मते, कुराणची आयत श्रवण केल्यानंतर मनाला शांतता मिळते.  त्यामुळे ही आयते जनावरांनादेखील ऐकवली गेली पाहिजेत. ती ऐकल्यावर जनावरे आरामदायक स्थितीमध्ये येऊ शकतील. त्याचा परिणाम बीफच्या गुणवत्ता सुधारणेत होईल, असा दावा कृषिमंत्र्यांनी केला. मात्र सरकारने या आदेशाच्या संदर्भात काहीही मुदत निश्चित केलेली नाही. हा आदेश जनतेवर थोपवण्यात आलेला नाही. लोक स्वयंस्फूर्तीने त्यात सहभागी होऊ शकतात. परंतु स्थानिक शेतकरी या माेहिमेला चांगला प्रतिसाद देतील, अशी आमची अपेक्षा आहे, असे अब्दुल्ला म्हणाले. राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी या मोहिमेत सहभागी होऊन बीफच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या कार्यक्रमात आपले योगदान देतील, अशी खात्री वाटते. केलान्तन राज्याची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. पॅन मलेशियन इस्लामिक पार्टीचे सरकार आहे. पॅन मलेशियन इस्लामिक पक्ष २०१५ मध्ये केलान्तनमध्ये कट्टर इस्लामिक नियम हुद्दूला लागू करण्यावरून चर्चेत आला होता. हुद्दू नियमात चोरीच्या आरोपीचे अंगाची कत्तल करणे किंवा दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेचा समावेश आहे. परंतु केंद्रीय सरकारच्या हस्तक्षेपानंतर हा नियम हटवला होता.  

 

मलेशिया पूर्वी हाेता सहिष्णू,  रूढीवाद वाढू लागला  
मलेशियातील एकूण लोकसंख्या ६० टक्क्यांहून जास्त आहे. अर्थात ३.२ कोटी लोक मुस्लिम आहेत. येथील मुस्लिमांना सहिष्णू मानले जात होते. परंतु आता रूढीवादी विचार वाढू लागले आहेत. देशात मीटच्या मागणीत दरवर्षी ३ टक्क्यांनी वाढ होत आहे.  

बातम्या आणखी आहेत...