आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊसच्या संपर्क संचालक होप यांचा चौकशीनंतर राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जनसंपर्क संचालक होप हिक्स यांनी २०१६ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेपाच्या चौकशीनंतर एक दिवसाने राजीनामा दिला होता. हाऊस इंटेलिजन्स कमिटीने हिक्स यांची मंगळवारी ९ तास चौकशी केली. अहवालानुसार त्यांनी कमिटीला सांगितले होते की, वेळ आलीच तर त्यांना साफ खोटे बोलण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांचे पदच तसे आहे. मात्र रशियाच्या हस्तक्षेपाविषयी त्यांनी कधीच खोटे वक्तव्य केले नव्हते. डेमोक्रॅटिक जनसंपर्क सल्लागार सीमोन सँडर्स यांनी म्हटले की, तुम्ही खोटे बोलल्याचे मान्य करत आहात. तुम्ही व्हाइट हाऊसच्या जनसंपर्क संचालक राहू शकत नाहीत.  


दरम्यान व्हाइट हाऊसच्या प्रवक्ता सारा सँडर्स यांनी म्हटले आहे की, हिक्स प्रशासनातून राजीनामा देतील, असे अधिकृतरीत्या आताच सांगता येणार नाही. होप हिक्स या ट्रम्प यांच्या विश्वासू आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, होप हिक्स चतुर आणि विचारशील व्यक्ती आहेत. त्यांनी राजीनामा दिला तर त्यांची उणीव प्रशासनामध्ये भासेल. त्यांना चांगल्या संधी मिळत असल्याने त्या राजीनामा देत आहेत, असेही ट्रम्प यांनी सांगितले.  


ट्रम्प यांच्या कंपनीतून व्हाइट हाऊसपर्यंत पोहोच

१३ सप्टेंबर २०१७ रोजी जनसंपर्क संचालक पदावर हिक्स यांची नियुक्ती झाली. जून २०१५ मध्ये ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचार अभियानापासून त्या सोबत आहेत. इवांका ट्रम्प यांच्या कापड व्यापारात सहायक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती होती. राष्ट्राध्यक्ष प्रचार अभिनायात प्रवक्ता म्हणून काम केले होते. 

 
रॉब पोर्टर प्रकरणात होपचे नाव होते चर्चेत

व्हाइट हाऊसचे कर्मचारी सचिव रॉब पोर्टर यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचे प्रकरण सुरू असताना प्रथमच होप हिक्स यांना प्रसिद्धी मिळाली. रॉब यांना या प्रकरणामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हिक्स व पोर्टर यांची जवळीक असल्याचे या वेळी उजेडात आले होते. पोर्टर यांच्यावरील आरोप समोर येण्यापूर्वीच राजीनामा देण्याची होप हिक्स यांची इच्छा होती

 

या पदाचा राजीनामा देणाऱ्या पाचव्या अधिकारी

ट्रम्प यांच्या कार्यकाळात जनसंपर्क संचालक पद सोडणाऱ्या हिक्स पाचव्या अधिकारी आहेत. यापूर्वी अँथनी स्कारमुक्सी, सीन स्पायसर, मायकल डुब्के, जेसन मिलर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या ८ महिन्यात हे पद तिसऱ्यांदा रिक्त झाले आहे. २९ वर्षीय माजी मॉडेल आणि ट्रम्प समूहाची माजी कर्मचारी हिक्स अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची सर्वात दीर्घकाळ सेवा करणाऱ्या सल्लागारांपैकी एक आहे. हिक्स यांनी म्हटले की, व्हाइट हाऊसमध्ये रुजू झाल्यानंतर मला जे साध्य करायचे होते ते मी केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...