आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयुक्त राष्ट्राच्या मंचावर रहेमानची जादू, ५० वर्षांनी भारतीय संगीताचा सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहेमान यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आयोजित समारंभात उपस्थितांची मने आपल्या संगीताच्या जादूने जिंकून घेतली. कर्नाटकी दिग्गज शास्त्रीय गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांचे संगीत, सुफी गाणी आणि रहेमान यांनी संगीतबद्ध केलेले ‘जय हो’ यांचे संयुक्त सादरीकरण त्यांच्या चमूने केले. ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय संगीताचे विविध प्रकार या समारंभात सादर करण्यात आले.

या संगीत समारंभाचे आयोजन संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी सदस्य आणि संस्कार नेत्रालय या भारतातील संस्थेने केले होते. सुब्बलक्ष्मींचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने यात त्यांना अभिवादन करण्यात आले. सुब्बलक्ष्मींच्या संयुक्त राष्ट्रातींल संगीत कार्यक्रमाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

ए.आर. रहेमान यांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या वेळी रहेमान यांनी पारंपरिक भारतीय पोशाख केला होता. राजनयिक, राजदूत व भारतीय-अमेरिकन नागरिकांची या वेळी उपस्थिती होती. रहेमान यांनी मंचावर पाऊल ठेवताच प्रेक्षकांनी हर्षोल्हासात भव्य स्वागत केले. रहेमान यांनी ३ तासांचे सादरीकरण केले. सनशाइनचे विद्यार्थी चमकले : ए. आर. रहेमान फाउंडेशनच्या सनशाईन ऑर्केस्ट्रॉच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण संस्मरणीय ठरले. प्रेक्षकांनी याला भरभरून दाद दिली. या प्रकल्पांतर्गत रहेमान वंचित तरुणांना संगीताचे शिक्षण देतात. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर सादरीकरण केल्याने आता तुम्ही स्वत:ला वंचित समजू नये. जगाच्या अग्रणी मंचावर तुम्ही आहात, असे या वेळी रहेमान विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. रहेमान यांच्या दोन बहिणींनी प्रसिद्ध गायक जावेद अली, शिवमणी यांच्यासह सादरीकरण केले.

लोकप्रिय गाण्यांचा समावेश : दिल से, बॉम्बे या चित्रपटांतील गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘वंदे मातरम्’ चे सादरीकरणही विशेष ठरले.
बातम्या आणखी आहेत...