आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची शक्तिशाली चाचणी; रशिया, चीनकडून टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल  - उत्तर कोरियाने रविवारी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचा दावा केला. अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अमेरिका, दक्षिण कोरियाच्या सुरक्षाविषयक संस्थांच्या मते आतापर्यंतचा हा सर्वात शक्तिशाली बॉम्ब असल्याचे मान्य केले आहे.  
 

उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणू शकतो. बॉम्बचे सर्व साहित्य उत्तर कोरियातच तयार करण्यात आले आहेत आणि त्याची क्षमता शेकडो किलो टन एवढी आहे. दक्षिण कोरियाच्या सुरक्षाविषयक संस्थेच्या मते, उत्तर कोरियाची ही सहावी चाचणी होती. ही चाचणी पाचव्या चाचणीच्या तुलनेत अधिक शक्तिशाली होती. त्याची क्षमता ५० ते ६० किलो टन असावी, असा अंदाज आहे. कोरियाच्या या चाचणीमुळे भूकंपासारखे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ६.३ रिश्टर एवढी नोंदवण्यात आली आहे.  
 

चाचणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. अॅबे म्हणाले, उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम सहनशीलतेच्या पलीकडचा आहे. अलीकडेच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागले होते.
 
 
रशिया, चीनकडून टीका  
उत्तर कोरियाचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले चीन व रशियाने या चाचणीनंतर उत्तर कोरियावर टीका केली. चुकीची कामे बंद करण्यात यावीत, कोरियन प्रदेशात अाण्विक शस्त्र स्पर्धा बंद करण्यासाठी वाटाघाटीत सहभागी होण्याचे आवाहन चीनने केले आहे. सर्व पक्षांनी शांतता बाळगावी, असे रशियाने म्हटले आहे. जुलैमध्येदेखील उत्तर कोरियाने दोन वेळा अणुचाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे तणावात वाढ झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरियाला कडक शब्दांत इशारा दिला होता. सुरक्षा परिषदेने कारवाईही केली होती. 
बातम्या आणखी आहेत...