आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ. कोरियाने जपानवरून पुन्हा डागले एक क्षेपणास्त्र; निर्बंध झुगारून चाचण्या सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाने सुरक्षा परिषदेच्या नव्या निर्बंधाला न जुमानता आपला अणुकार्यक्रम सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी कोरियाने जपानवरून आणखी एक क्षेपणास्त्र डागले. त्याचबरोबर एक क्षेपणास्त्र प्रशांत महासागरात डागण्यात आले.  कोरियाच्या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे. अमेरिका, जपानचे त्यामुळे धाबे दणाणले आहे.  
 
आतापर्यंत उत्तर कोरियाने सहा वेळा क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही काेरियाने सातव्यांदा चाचणी करून आपला कार्यक्रम सुरूच राहील, असे कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बाॅम्बची चाचणी घेतली होती. तो बाॅम्ब शक्तिशाली आहे व तो या क्षेपणास्त्रातून जपान आणि अमेरिकेतील लक्ष्य भेदून जाऊ शकतो, असा दावा कोरियाकडून करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते सुमारे ३ हजार ७०० किलोमीटर अंतरावर जाऊन पडले, असा दावा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या कृतीमुळे जागतिक तणावात भर पडली आहे. मात्र या गोष्टीची हुकूमशहा किम जाेंग उन यांना काहीही पर्वा नाही. म्हणूनच अणुकार्यक्रमासंबंधी तज्ज्ञांशी चर्चा, पाहणीची त्यांची छायाचित्रे दररोज जारी होऊ लागली आहेत. त्यासाठी कोरियाने आपल्या कार्यक्रमाबद्दल जगाला माहिती व्हावी म्हणून प्रसारमाध्यमांनाही भेटीबरोबरच चर्चेची मोकळीक देऊन टाकली आहे.  
 
ते पाहा मिसाइल..मिसाइल
टीव्हीवर हास्यविनोदाचे कार्यक्रम’  : उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानच्या आकाशातून गेले. तो क्षण पाहण्यासाठी सामान्य जपानी नागरिक तसेच प्रसारमाध्यमांतून उत्सुकता दिसून आली. लाखो जपानी नागरिकांनी क्षेपणास्त्र आकाशातून क्षणार्धात निघून गेल्याचा थरार पाहिला. त्याबद्दल सोशल मीडियातून परिचितांना लगबगीने कळवले. टीव्ही निर्मात्यांनी न्याहारीच्या वेळच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांना रद्द करून मुलांचे हास्यविनोदाचे कार्यक्रम प्रसारित केले. 
बातम्या आणखी आहेत...