आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ.कोरियाकडून धोका; संरक्षण बजेट पाच लाख कोटी रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण बजेट ७०० अब्ज डॉलर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ते मागील बजेटपेक्षा ८१ अब्ज डॉलरने अधिक आहे. म्हणजे संरक्षण बजेट १४% नी वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. सिनेटने मंजुरी दिली तर ही २००३ नंतरची सर्वात मोठी वाढ असेल. २००१ मध्ये झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने संरक्षण बजेटमध्ये २६% वाढ केली होती. विशेष म्हणजे फेब्रुवारीत ट्रम्प यांनी संरक्षण बजेटमध्ये ५४ अब्ज डॉलर वाढीचा प्रस्ताव मांडला होता. पण उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीनंतर आणखी वाढीचे संकेत दिले. ट्रम्प सरकारने बजेटची जी रूपरेषा तयार केली आहे, त्यानुसार परदेशांना दिली जाणारी मदत आणि अंतर्गत कार्यक्रमांत कपात करून ही रक्कम उभी केली जाईल. पाकिस्तानला नॉन-नाटो ग्रूपअंतर्गत मिळणारा दर्जा कमी केला जाईल. बजेट प्रस्तावाशी संबंधित माहिती ठेवणाऱ्या अधिकारी म्हणाले की, पर्यावरण संरक्षण संस्था, परराष्ट्र मंत्रालय आणि विदेशी मदत यात कपात होऊ शकते. बजेट वाढवल्याने देशाच्या लष्करी क्षमतेत वाढ होईल, असा तर्क देण्यात आला आहे.
 
असे खर्च हाेईल बजेट: 
४ लाख काेटी विदेशी सैन्य मिशनसाठी
-  ४१ लाख काेटी पेंटागाॅनसाठी, जे सैनिकांसाठी शस्त्रे खरेदी व सैनिकांच्या वेतनावर खर्च हाेतील.
-  ६० अब्ज डाॅलर्स म्हणजे सुमारे ३.९ लाख काेटी रुपये अफगाणिस्तान, इराक, सिरिया यासारख्या युद्धाचा फटका सहन करणाऱ्या देशांच्या मिशनवर.
- रडारपासून बचावून निघणाऱ्या एफ-२२ राप्टरसारख्या शस्त्रप्रणालीवर खर्च हाेणाऱ्या बजेटमध्ये कपात हाेऊ शकते. तसेच टाेही व अन्य शस्त्रांवरील बजेट वाढवले जाईल.
-  प्रस्तावांतर्गत पाकिस्तानचे नाॅन नाटाे सदस्य देशाच्या पातळीवर मिळणारे महत्त्व कमी केले जाईल व अार्थिक मदतीत कपात हाेईल.
 
अर्थ : वाढीतून ट्रम्प यांचा उ.काेरियाला संदेश देण्याचा प्रयत्न
उत्तर काेरियाने बंदी असतानाही हायड्राेजन बाॅम्ब, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली  अाहे. उत्तर काेरियाचे हुकूमशहा किम जाेंग उन अमेरिकेला नष्ट करण्याची सतत धमकी देत अाहे. त्यामुळे दक्षिण काेरिया, जपानसह अमेरिकेत तणाव अाहे.
 
 
अायएस : ची शिबिरे व सिरियात वाढतील अमेरिकी हल्ले
ट्रम्प यांनी निवडणुकीत दहशतवादी संघटना अायएसअायएसचा खात्मा करण्याचे अाश्वासन दिले हाेते. त्यामुळेच विदेशी सैन्य मिशनच्या बजेटमध्ये वाढ करण्यात अाली अाहे. साेबतच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या विस्तारवादी धाेरणास राेखणे, हेदेखील एक कारण अाहे. 
 
 
उत्तर कोरियाच्या  सीमेवर अमेरिकेचे विमान
अमेरिका आणि उत्तर कोरियातील तणाव कमी होत नसल्याचे चित्र आहे. कोरियाने डोळे वटारल्यानंतर अमेरिकेनेही पलटवार केला आणि कोरिया द्वीपाच्या वरून आपले विमान उडवून शक्तिप्रदर्शन केले. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेच्या चार एफ ३५-बी लढाऊ विमान आणि दोन बी-१बी बॉम्बवर्षक विमानांनी या भागात उड्डाण केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अलीकडेच उत्तर कोरियाने अणुचाचणी आणि क्षेपणास्त्र चाचणी करून अप्रत्यक्षरीत्या अमेरिकेवर दबावाचा प्रयत्न केला होता.
 
 
बातम्या आणखी आहेत...